शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:24 IST

दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी चर्चे दरम्यान, शिवसेनेचे जि़प़ सदस्य विष्णू मांडे यांनी मानवत तालुक्यात प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना डावलून काम सुरू असल्याचा आरोप केला़ जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई आढावा बैठका घेण्यात आल्या; परंतु, मानवतला बैठक घेण्यात आली नाही़ एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचा आराखडाही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पाठविण्यात आला़ पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशील आहे़ त्यामुळे याबाबतची जाण आम्हालाही आहे; परंतु, लोकप्रतिनिधींना कोणतीही कल्पना न देता ग्रामसेवक चुकीची माहिती वरिष्ठांना देत आहेत़ विशेष म्हणजे ८ ते १५ दिवसांत कधी तरी ग्रामसेवक गावांत येतात़ अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागते़ त्यामुळे प्रशासनाची ही भूमिका अयोग्य आहे़, असेही यावेळी मांडे म्हणाले़ यावर शिवसेनेचे सदस्य राम खराबे यांनी सेलूतील बैठकीला आपणासही बोलावण्यात आले नाही, असे सांगितले़ यावेळी सीईओ बी़ पी़ पृथ्वीराज यांनी प्रशासनाकडून यापुढे काळजी घेतली जाईल, असे सांगितले़ यावेळी सिंचन विभागातील प्रभारी उपअभियंता टने हे १९९५ पासून एकाच जागेवर जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहेत़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी त्यांची जिंतूर येथे बदली केली होती़ काही दिवसच त्यांनी जिंतूर येथे काम केले व पुन्हा ते जिंतूर येथे नियुक्ती असताना परभणीत काम करीत आहेत़ त्यांचे हे लाड कशासाठी प्रशासन करीत आहे? असा सवाल करून सेलू, मानवत, जिंतूर व पाथरी तालुक्यातील शेतकºयांची ते अडवणूक करीत आहेत, असा आरोपही यावेळी विरोधी सदस्यांनी केला़ टने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ यावेळी अन्य काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली़बुधवारी सर्वसाधारण सभा४जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी २ वाजता जि़प़च्या सभागृहात होणार आहे़ गेल्या वेळी ही सभा प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित नसल्याने तहकूब करण्यात आली होती़ आता बुधवारी ही सभा होणार असल्याने या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदShiv Senaशिवसेना