शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:50 IST

: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़२००९-१० पासून जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळी तर कधी नापिकी परिस्थिती ओढावत आहे़ त्यामुळे उसणवारी करून व बँकांकडूनपीक कर्ज मिळवून दरवर्षी शेतकरी रबी व खरीप हंगामामध्ये पेरणी करीत आहे़ पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कवडीचेही उत्पन्न लागत नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ त्याचबरोबर बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही त्याच्या डोक्यावर वाढत आहे़त्यामुळे बँकांनी पीक कर्ज देण्यास आखडता हात घेतला़ त्यानंतर शेतकºयाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना व शेतकºयांकडून करण्यात आली़ या मागणीचा विचार करून राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली़ त्यानुसार २००९-१० पासून सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी २४ जून २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत या कर्जमाफी योजनेला मान्यता देण्यात आली़२८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ची घोषणा करण्यात आली़ या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह लाभार्थी शेतकºयांचे दीड लाख रुपये कर्ज माफ करण्याचे ठरविण्यात आले़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांची दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, त्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनाही अंमलात आणली़ त्यानुसार दीड लाखांपेक्षा अधिक असलेले कर्ज भरल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकºयांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम ३० जून २०१९ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात येत असल्याने यामध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे़त्यानुसार आता ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत या योजनेचा संबधितांना लाभ घेता येणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़बँकनिहाय पात्र ठरलेले लाभार्थी शेतकरी४छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अलहाबाद बँकेने आतापर्यंत ३ हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़ त्याचबरोबर अंध्रा बँकेने १ हजार २८१, अ‍ॅक्सीस बँकेने ३३ शेतकरी, बँक आॅफ बडोदा १ हजार ७५४, बँक आॅफ इंडिया १ हजार ७०२, बँक आॅफ इंडिया ८ हजार ९६०, कॅनरा बँक ९४२, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ६२२, देना बँक २ हजार १५७, एचडीएफसी ३३६, आयसीआयसीआय १५, आयडीबीआय ३९६ शेतकºयांना लाभ दिला आहे़४इंडियन ओव्हरसीस बँक ३३८, पंजाब नॅशनल बँक १५१, सर्वाधिक स्टेट बँक आॅफ इंडिया ७८ हजार ४३८, सिंडीकेट २७९, युको १ हजार ३८०, युनियन बँक आॅफ इंडिया ९०५, सर्वात कमी विजया बँकेने एका शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ दिला आहे़ त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २२ हजार २११ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २७ हजार २३२ अशा एकूण १ लाख ५२ हजार ७४६ शेतकºयांच्या खात्यावर ८५६ कोटी १६ लाख ३१ हजार ३०८ रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज