शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:44 IST

जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.वादळी वाºयासह विजांचा कडकडाट व गारांचा पाऊस झाल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. मंगळवारी रात्री वातावरणामध्ये अचानक बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याची माहिती समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने हळदीच्या पिकासह आंब्याचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण होते.सेलू शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ७.३० वाजता पाऊस झाला. त्याचबरोबर देवगावफाटा येथेही १५ मिनिटे वाºयासह पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. मानवत शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कोठेही नुकसान झाले नसल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. सोनपेठमध्ये मंगळवारी सकाळी १० मिनिटे पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.बामणी परिसर : नऊ गावे २४ तासांपासून अंधारातबामणी- बामणी व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, २४ तासांपासून ही गावे अंधारात आहेत.मंगळवारच्या वादळी वाºयामध्ये बामणी व सावंगी भांबळे येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. बामणी, संक्राळा, कोलपा, कोरवाडी, कुंभेफळ, सावंगी, धमधम, असोला, कावी आदी गावांत विद्युत खांब कोसळले तसेच तारा तुटल्या आहेत.जखमी वृद्धाचा मृत्यूसावंगीत परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, नारायण खाडे, शिवाजी खाडे, सोपान खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भितीला तडे जाऊन भिंती पडल्या. या घटनेत सावंगी भांबळे येथील ग्यानोजी मोरे (७०) हे पत्र्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना मंगळवारी रात्री उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; परंतु, १७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.शहापूरमध्ये २० मिनिटे गारपीटपरभणी- तालुक्यातील शहापूूर येथे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामध्ये सलग २० मिनिटे गारा पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सोसाट्याच्या वादळी वाºयासह विजांचा कडकडाट होत आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहापूर येथे २० मिनिटे गारा पडल्या.या गारांमुळे शहापूर व परिसरातील हळद, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस