शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जुगार अड्ड्यावर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:21 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून २५ फेब्रुवारी रोजी विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून २५ फेब्रुवारी रोजी विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत.गंगाखेड शहरात जगदंबा देवी मंदिरासमोर जुगार सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी रावसाहेब मारोती शिंदे हा जुगार चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या ताब्यातून १ हजार ८८० रुपये जप्त करण्यात आले.तसेच तालुक्यातील इसाद गावात विवेक बालासाहेब भोसले व माधव सखाराम भोसले हे दोघे जुगार चालवित होते. पोलिसांनी दोघांवर छापा टाकून जुगारात जमा झालेले ११ हजार १६० रुपये व एक मोबाईल असा १२ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला.परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभेदार नगर येथे २६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा टाकून अफसर खान असद खान आणि अकबर खान हयात खान या दोघांकडून २ हजार ३६० रुपये व एक मोबाईल जप्त केला आहे. या तिन्ही कारवाया पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केल्या.तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानेही जुगार अड्ड्यावर छापे टाकले आहेत. जिंतूर शहरातील शिवाजी चौक परिसरात एका पानटपरीमध्ये अब्दुल रफीक अब्दुल खालेक हा मुंबई नावाचा मटका घेत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ९२० रुपये जप्त केले आहेत.मंगळवारी सायंकाळी चारठाणा बसस्टॅन्ड समोर प्रकाश देविदास जाधव हा अवैधरित्या दारु विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून दारुच्या १० बाटल्या आणि नगदी ६५० रुपये, एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थागुशाच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस