शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:41 IST

जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडले असून, वारंवार पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नसल्याने कर्मचाºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे़ दरम्यान, गं्रथालय कर्मचाºयांंनी या प्रश्नावर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडले असून, वारंवार पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नसल्याने कर्मचाºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे़ दरम्यान, गं्रथालय कर्मचाºयांंनी या प्रश्नावर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे़महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ तसेच सार्वजनिक कर्मचारी कृती समितीच्या वतीने ग्रंथालय चळवळीच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला जात आहे़ मोर्चा, निवेदन, धरणे आदी मार्गाने आतापर्यंत आंदोलने करण्यात आली़ परंतु, प्रत्यक्षात शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही़ गं्रथालयातील कर्मचाºयांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन दिले जाते़ महागाई निर्देशांकानुसार वेतनात वाढ होणे अपेक्षित आहे़ तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन परिरक्षण अनुदानात वाढ करावी, सार्वजनिक ग्रंथालयांना तीन पट वाढीव अनुदान द्यावे, अशा मागण्या आहेत़ वेळोवेळी पाठपुरावा करूनही मागण्या मंजूर होत नसल्याने या कर्मचाºयांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे़ याबाबत १९ सप्टेंबर रोजी जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन केले जाणार असून, त्यात या मागण्या लावून धरल्या जाणार आहेत़अशा आहेत मागण्यासार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांना २०१२ मधील थकीत असलेले ५० टक्के परिरक्षण अनुदान वाढ करून तीनपट अनुदान द्यावे, कर्मचाºयांना किमान वेतनाऐवढे वेतन द्यावे, ग्रंथालय कर्मचाºयांसाठी वेतनश्रेणी, सेवा शर्ती, सेवा नियम मंजूर करावेत, शासकीय कामकाजाच्या नियमानुसार कर्मचाºयांच्या कामाचे तास निश्चित करावेत, २०१२ पासून बंद केलेला दर्जा, बदल व नवीन शासन मान्यता सुरू करावी, या मागण्यांचा समावेश आहे़राज्यात २१ हजार कर्मचारीराज्यात १२ हजार १४८ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये असून, त्यात सुमारे २१ हजार ६११ कर्मचारी आणि ८५ हजार पदाधिकारी कार्यरत आहेत़ कर्मचाºयांच्या मागण्या प्रलंबित असल्याने १९ सप्टेंबर रोजी राज्यस्तरावर धरणे आंदोलन केले जाणार आहे़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले जाणार आहे़, असे परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर, कोषाध्यक्ष प्रा़ दत्ता पवार, सचिव विलास शिंदे, के़बी़ शिंदे आदींनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीlibraryवाचनालयEmployeeकर्मचारीGovernmentसरकार