शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.येलदरी धरणातून तीन जिल्ह्यांमधील शहरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण परिसरातच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणाखाली तीन बंधारे बांधले असून या बंधाºयात एप्रिल महिन्यापर्यंत पाणीसाठा राहतो.मात्र यावर्षी बंधाºयातील पाणी नोव्हेंबरमध्येच संपले आहे. परिणामी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे या भागातील सावळी, घडोळी, हिवरखेडा, केहाळ, चिंचखेडा, आमदरी, ब्रह्मवाडी, सावंगी म्हाळसा आदी गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणवटे, ओढे, नदीतील डोह आटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.दरम्यान, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाºयासाठी येलदरी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून केली गेली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने परिसरात खरीप आणि रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न पशुपालकांसमोर असून येलदरी प्रकल्पातून टप्प्या टप्प्याने १२ दलघमी पाणी पूर्णा नदीत सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी