शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:07 IST

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.परभणी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तालुक्यातील १३१ गावांमध्ये ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती; परंतु, कापसावर शेंद्री बोंडअळीने हल्ला चढविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. २०१८-१९ या खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीमध्ये घट होईल, अशी चिन्हे होती. त्यानुसार यावर्षी तालुक्यात २९ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५ हजार हेक्टर कापसाची लागवड घटली आहे.शेतकºयांनी लागवड केलेले कापूस पीक पात्या-फुलांच्या अवस्थेत आहे. असे असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकाला घेरले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना धीर देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ४८ कृषी सहाय्यकांकडून तालुक्यातील १३१ गावांमध्ये २६ जुलैपासून क्रॉपसॅप अभियानांतर्गत बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. १६ दिवसांमध्ये १०० गावांतील शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी व पावसाचा खंड या दोन्ही बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोयाबीन पीक पावसाच्या खंडकाळात तग धरुन रहावे यासाठी खते व औषधींची मात्रा देण्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये जाऊन बोंडअळीबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.४०० शेतकºयांना दिले प्रशिक्षणतालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १३१ गावांमधील ४०० शेतकºयांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दोन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावांमध्ये वाहनांद्वारे जनजागृतीही केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकºयांना धीर मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी