शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

परभणी : आहारातूनच आरोग्याची समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:24 IST

दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राठोड बोलत होत्या़ जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, आहारतज्ज्ञ प्रा़डॉ़वर्षा झंवर यांची उपस्थिती होती़ महिला व बालविकास विभागाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात पोषण माह कार्यक्रम राबविला जाणार आहे़ त्यात हात धुणे, स्वच्छता, पौष्टिक आहार, अ‍ॅनेमिया, अतिसार या बाबींवर लक्ष दिले जाणार आहे़ कुपोषित बालकांच्या घरी भेटी देणे, स्तनदा मातांना गृहभेटी, किशोरवयीन मुलींचे आरोग्य, बालकांचा आहार, कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत़ त्याचप्रमाणे समुदाय आधारित कार्यक्रम, परसबागांचे संवर्धन, परिसर स्वच्छता, शाळा आधारित कार्यक्रम, पालक मेळावे, माता बैठका, युवा सभा, पथनाट्य आदी कार्यक्रम होणार आहेत़ या प्रसंगी भावनाताई नखाते, प्रा़डॉ़वर्षा झंवर, विजय मुळीक, कैलास घोडके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कार्यक्रमास जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मुख्य सेविकास, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद