शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सिंचन विहिरींचे प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 01:00 IST

तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़पालम तालुक्यात यावर्षी दुष्काळी स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे़ शेतीत कामधंदा नसल्याने मजूर वर्ग स्थलांतर करीत आहे़ गावात हाताला काम व कामाप्रमाणे दाम देण्यासाठी शासन रोजगार हमी योजना राबवित आहे़ मागील वर्षी पंचायत समितीकडे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर नवीन सिंचन विहिरींसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छाननी समितीने ३८० कामांना बैठकीत मंजुरी दिली होती़ यानंतर प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशासाठी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविण्यात आला होता़संचिकांच्या प्रवासात पावसाळा सुरू झाल्याने एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नाही़ मात्र आता जिल्हा परिषद स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत़प्रस्तावासोबत जिओ टॅगींग करून जागेचा फोटो व पंचनामा पाठविण्याचे आदेश आहेत़ मात्र याकडे ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कर्मचाºयांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळे महिनाभरापासून प्रस्ताव धूळ खात पडले असून, याचा शेतकºयांना फटका बसत आहे़शेतकºयांचे कार्यालयात हेलपाटे४रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचे काम करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत़ ग्रामपंचायतमार्फत प्रस्ताव सादर करून दोन वर्ष संपत आले तरी नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारून बेजार होत आहेत़४एकीकडे तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे़ असे होत असताना मजुरांच्या हाताला काम मिळणे आवश्यक होते़ परंतु, प्रशासकीय दिरंगाईचा फटका सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना बसत आहे़ याकडे सीईओंनी लक्ष देणे गरजेचे आहे़रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या मंजूर झालेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत़ यासाठी कर्मचारी वर्गाला सूचना देण्यात आल्या आहेत़-धाबे, गटविकास अधिकारी, पालम

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी