शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:42 IST

दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते़ टंचाई कालावधीत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ त्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो़ दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते़ त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी, टंचाईग्रस्त गावाला गावातच पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी ग्रामपंचायतस्तरावर गावातील सार्वजनिक जागेत विहीर घेण्याची योजना आखली आहे़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ झाला असून, ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक विहिरींसाठी प्रस्ताव मागविले जात आहेत़ २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला ५३९ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १६९ प्रस्तावांना आॅनलाईन वर्ककोड देण्यात आला आहे़ तालुकास्तरीय समितीने ३९२ प्रस्तावांना मान्यता दिली असून, जिल्हास्तरीय समितीने त्यातील ३८७ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़ त्यापैकी १४३ गावांमध्ये सार्वजनिक विहीर घेण्याचे काम सुरू झाले आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत़ गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतल्याने त्या गावातील पाणीटंचाई दूर होणार असून, या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ