शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :२२० लाखांच्या किरायाच्या वाहनांचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:37 IST

जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, बांधकाम सभापती अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रशासनाच्या वतीने जि़प़तील विविध विभाग प्रमुखांसाठी २२ वाहने किरायाने लावण्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला़ या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी, काँग्रेसचे जि़प़ सदस्य समशेर वरपूडकर यांनी आक्षेप घेतला़ २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने प्रशासन किरायने घेऊ इच्छिते ही बाब चुकीची असून, एवढ्या रकमेत नवीन वाहने जि़प़ला मिळू शकतात़मग किरायावर एवढी उधळपट्टी कशासाठी करायची? असा सवाल जि़प़ सदस्य चौधरी व वरपूडकर यांनी उपस्थित केला़ यावर प्रशासनाने सदरील विभाग प्रमुखांना वाहन खरेदीचे अधिकार नाहीत़ त्यामुळे ते वाहन खरेदी करू शकत नाहीत, असे सांगण्यात आले़ या संदर्भात सर्वसाधारण सभेत प्रस्ताव दाखल झाला नाही़ थेट स्थायीतच कसा काय प्रस्ताव आला? वाहन खरेदीचे अधिकार विभागप्रमुखांना नसतील तर तशी नोट सभागृहासमोर सादर करा, आम्ही राज्य शासनाकडे विशेष विनंती करून वाहन खरेदीची परवानगी मागूत, परवानगी मिळालीच नाही तर त्यावर विचार करूत, असे सदस्य म्हणाले़ त्यानंतर काही सदस्यांनी या संदर्भात निविदा काढण्यात आल्या होत्या का? अशी विचारणा केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने निविदा काढण्यात आले असल्याचे सांगितले़ त्यावर तीन वेळा या संदर्भात निविदा काढण्यात आल्या; परंतु, त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही़ प्रत्येक वेळा एकच निविदा आली़ तीच निविदा कशी काय मंजूर करता? असा सदस्यांनी सवाल करून मोठ्या वृत्तपत्रामध्ये या संदर्भात जाहिरात द्या, ज्यामुळे निविदांना प्रतिसाद मिळेल, असे सांगितले़ त्यावर जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी प्रशासनास या संदर्भात नव्याने दरनिश्चिती करा व नव्याने निविदा मागवून घ्या, असे सांगितले़यावेळी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत लेखा शिर्षाअंतर्गत ३ कोटी ५१ लाख रुपये अंदाजित किंमतीच्या ९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली़ त्यामध्ये जोड रस्ता कानडखेडा ते पूर्णा आबादी रस्ता सुधारणा (अंदाजित किंमत ३९ लाख), पूर्णा आबादी जोड रस्ता कानडखेडा रस्ता सुधारणा (३८ लाख), वझर-खोरवड रस्ता सुधारणा करणे व पूल, मोऱ्या बांधकाम करणे (४७ लाख), देवसडी ते आडगाव रस्ता सुधारणा करणे व पूल बांधकाम करणे (३४ लाख), राज्य मार्ग २४८ पासून जोड रस्ता पांगरी रस्त्याची सुधारणा करणे, पेव्हर ब्लॉक व सीसी रस्ता करणे (३७ लाख), राम भरोसे ते मिर्झापूर पूल बांधकाम व रस्ता सुधारणा करणे (३२ लाख), सुकापूर वाडी ते हट्टा रस्ता सुधारणा करणे (४० लाख), राज्य मार्ग २४८ ते टाकळी कुंभकर्ण सीसी रस्ता, पेव्हर ब्लॉक करणे (४२ लाख), राज्य मार्ग ६१ पासून राज्य मार्ग २३५ ला मिळणारा रस्ता सुधारण करणे व सीसी रोड, पूल, मोºया बांधकाम करणे (४२ लाख) या रस्ता कामांचा समावेश आहे़गतवर्षी किरायाच्या वाहनांवर २ कोटी रुपयांचा खर्च४जिल्हा परिषदेतील विविध विभाग प्रमुखांसाठी आणि इतर यंत्रणांसाठी गतवर्षी किरायाने वाहने लावण्यात आली होती़ त्यावर २ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला़ या २ कोटी रुपयांमध्ये जवळपास २० ते २२ नवीन वाहने खरेदी करता आली असती़४तसेच ती जिल्हा परिषेदच्या मालकीची झाली असती़ त्यामुळे दुसºया वर्षी किरायाने वाहन घेण्याची आवश्यकता लागली नसती; परंतु, गतवर्षी तब्बल २ कोटी रुपये यावर प्रशासनाच्या वतीने खर्च करण्यात आले़४आता यावर्षीही २ कोटी २० लाख रुपये किरायाच्याच वाहनांवर खर्च करण्याचा प्रशासनाकडून करण्यात आलेला खटाटोप सदस्यांनी हाणून पाडला़ बुधवारच्या स्थायीच्या बैठकीत यावर चर्चा होवून नवीन वाहन खरेदीसह त्यावर कंत्राटी पद्धतीने अंदाजे दरमहा १० हजार रुपये प्रमाणे वाहन चालक नियुक्त करावा, अशीही सूचना यावेळी सदस्यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद