शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

परभणी : ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:18 IST

शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही बदल करीत रात्री उशिरापर्यंत थकबाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही बदल करीत रात्री उशिरापर्यंत थकबाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़शहरात मालमत्ता कर आणि नळपट्टी वसुलीवरच महानगरपालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे़ याशिवाय वृक्ष, शिक्षण, स्वच्छता हे करही मनपा वसूल करते; परंतु, त्याचा अंतर्भाव मालमत्ता करामध्ये असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीला महत्त्व आले आहे़ परभणी शहरात सुमारे ८५ हजार मालमत्ता असून, या मालमत्ता धारकांकडून आतापर्यंत नियमित कर वसुली होत नव्हती़ परिणामी थकबाकीचा आकडाही मोठ्या प्रमाणात आहे़ दोन वर्षापूर्वी मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर यात सुसूत्रता आली आहे़ सद्यस्थितीला शहरवासियांकडे सुमारे ६५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला असून यातील चालू थकबाकीचे २३ कोटी रुपये वसूल मनपाला अपेक्षित आहे़ ही रक्कम वसूल करण्यासाठी १ मार्चपासूनच प्रशासनाने नियोजन केले आहे़ त्यासाठी ३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रभाग समितीनिहाय सर्व नागरिकांपर्यंत कराची बिले पोहचती झाली आहेत़ त्यामुळे हा कर वसुलीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ घरोघरी जाऊन वसुली केली जात असून, तीनही प्रभाग समिती कार्यालयात रात्री ८ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे यावर्षी मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली़ंसव्वातीन कोटींची वसुली४मनपा प्रशासनाने शहरात वसुली मोहिमेला गती दिली असून, २९ फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी ३६ लाख रुपयांची वसुली झाली आहे़४१ मार्चपासून रात्री उशिरा, त्याच प्रमाणे सुटीच्या दिवशीही वसुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत संपूर्ण वसुली केली जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला़नळ जोडणीचा होणार परिणाम४यावर्षी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, योजनेवर नागरिकांना नळ जोडणी दिली जात आहे़ ही जोडणी घेताना प्रत्येक नागरिकाला त्याची थकबाकी अदा करणे बंधनकारक आहे़ त्याच प्रमाणे मुदतीत कर भरणा करणाºया नागरिकांना मालमत्ता कराच्या शास्तीवर ५० टक्के आणि पाणी कराच्या शास्तीवर १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे यावर्षी निश्चितच मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात होईल, अशी आशा आयुक्त रमेश पवार यांनी व्यक्त केली़आॅनलाईन सॉफ्टवेअरचीही मदत४शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्याचबरोबर यावर्षी सर्व मालमत्ताधारकांच्या नोंदी आॅनलाईन सॉफ्टवेअरला करण्यात आल्या आहेत.४यावर्षी प्रथमच महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअरमध्ये प्रिंट झालेली मालमत्ता बिले शहरवासियांना वितरित केली आहेत. वसुली झाल्यानंतर या बिलांची नोंद सॉफ्टवेअरलाच होणार असल्याने थकबाकी आणि वसुलीची माहितीही एका क्लिकवर मिळणार असल्याने या सॉफ्टवेअरची वसुलीसाठी एक प्रकारे मदतच होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर