शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बनावट आॅईल उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:35 IST

दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल विना परवाना तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल विना परवाना तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे.या संदर्भात पोेलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील नागसेननगर येथे विना परवाना आॅईल तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्याविषयी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी छापा टाकण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे मालक अब्दुल रहेमान खान ऊर्फ सद्दाम, अब्दुल हमीद खान हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडे आॅईल उत्पादनाच्या परवान्याविषयी विचारणा केली असता त्यांनी महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियमांतर्गत पुणे येथील एक्सएल आॅईल विक्रीचा नोंदणी दाखला असल्याचे सांगितले. तसेच आॅईल उत्पादित करण्यासाठी लागणारा परवाना सादर करण्यास अवधी मागितला होता. पोलीस पथकाने पंचनामा केला असता या ठिकाणी ३ लाख १५ हजार ८०० रुपयांचे साहित्य मिळून आले. या साहित्याद्वारे खुल्या आॅईलच्या मिश्रणातून एक्सएल आॅईल या नावाचे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल उत्पादित केल्याचे निदर्शनास आले. या आॅईलच्या सीलबंद पाकिटांवर एसआर नं.४८/३/शिवाजी चौक, चंदननगर पुणे असा पत्ता दिसून आला. प्रत्यक्षात आॅईल परभणी येथे तयार करीत असताना उत्पादनाचा पत्ता पुणे येथील आढळला. तसेच उत्पादनावर एपीआय व आएसओ: ९००१: २००८ हे मार्क वापरल्याचे आढळून आले. या सर्व प्रकरणात बनावटपणा असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच आॅईल उत्पादनाचा परवाना सादर करण्याचा अवधी देऊनही तो ११ दिवसांत सादर न केल्याने वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी किशोर नाईक यांच्या फिर्यादीवरुन अ.रहेमान खान अ.हमीद खान यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे हे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.४या कारवाई दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी एक हत्यार आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहे. तसेच उत्पादनांवर एपीआय हा मार्क परवाना नसताना व उत्पादनाचाच परवाना नसताना आयएसओ नामांकन देखील वापरल्याने निदर्शनास आले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस