शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी ; ग्रामपंचायतीसमोर केली अंत्यसंस्काराची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:54 IST

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील तणाव निवळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील तणाव निवळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे घडली.तालुक्यातील रामेटाकळी येथील मातंग समाजातील लक्ष्मण नवगिरे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी १४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. गावात मातंग समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे.गावातून या ठिकाणी जाण्यासाठी एक कि.मी.चे अंतर शेतकऱ्यांना कापावे लागते. मात्र स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर लघूसिंचन विभागाने बंधारा बांधला आहे. या बंधाºयात पाणी आल्याने स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता शिल्लक नाही. त्यामुळे वारंवार मागणी करूनही रस्ता होत नसल्याने मातंग समाजाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात आले. याची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. तसेच लालसेनेचे गणपत भिसे, अशोक उफाडे, किशोर कांबळे, कोंडिबा जाधव हे ही गावात दाखल झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता तहसीलदार डी.डी. फुफाटे, नायब तहसीलदार नकूल वाघुंडे, पोलीस निरीक्षक मीना कर्डक पोलिसांच्या ताफ्यासह गावात दाखल झाल्या. स्मशानभूमीत जाणाºया रस्त्याची पाहणी करून मयत लक्ष्मण नवगिरे यांच्या घरी भेट दिली. यावेळी स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने समाजाला दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. तहसीलदार फुफाटे यांनी १८ डिसेंबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक व समाजबांधवांनी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सहमती दिली. दुपारी दोन वाजता तहसीलदार व पोलिसांच्या उपस्थितीत लक्ष्मण नवगिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन