शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कनेक्टीव्हिटीअभावी रेल्वेची टपाल सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:59 IST

येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे टपाल सेवा चालविली जाते़ या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वाचे टपाल पोहचती करण्याचे काम केले जाते़ रजिस्ट्री, स्पीड पोस्ट तसेच इतर टपाल सेवा या कार्यालयातून दिली जात आहे़ भुसावळ येथील कार्यालयांतर्गत चालणाऱ्या परभणी येथील टपाल कार्यालयाला सीफी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आॅनलाईन नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे़ मात्र मागील महिनाभरापासून कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने टपाल सेवा खोळंबली आहे़ रजिस्ट्री, स्पीड पोस्ट यासारखी टपाल सेवा आॅनलाईन पद्धतीने चालविली जाते; परंतु, नेटवर्क मिळत नसल्याने येथील कामकाज ठप्प पडले आहे़परभणी येथील टपाल कार्यालयातून दररोज सुमारे १०० टपालांची आॅनलाईन नोंदणी करून दिली जाते़ परंतु, मागील एक महिन्यापासून ही सेवा ठप्प पडली आहे़ या संदर्भात परभणी कार्यालयातून भुसावळ येथील विभागीय टपाल कार्यालयाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे़ मात्र अद्यापपर्यंत ठोस उपाय केले नसल्याने नेटवर्कची समस्या भेडसावत आहे़ आॅनलाईन टपाल पाठवित असताना नेटवर्क मिळणे आवश्यक आहे़; परंतु, हे नेटवर्क मिळत नसल्याने या कार्यालयातील टपाल सेवा ठप्प पडली आहे़इतर टपाल सेवेच्या तुलनेत रेल्वेची टपाल सेवा जलद असल्याने नागरिक मोठ्या संख्येन या सेवेचा वापर करतात़ महत्त्वाचे टपाल रेल्वेच्या टपाल सेवेमार्फतच पाठविले जातात; परंतु, महिनाभरापासून नेटवर्क अभावी टपाल सेवा ठप्प असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़दररोज सुमारे १०० टपालांची आवकयेथील रेल्वे टपाल सेवेच्या माध्यमातून दररोज साधारणत: १०० टपालांची आवक होते़ त्यात ३० ते ४० रजिस्ट्री टपाल आणि ५० ते ६० स्पीड पोस्टचा समावेश आहे़ या माध्यमातून दिवसाकाठी साधारणत: २ हजार ५०० रुपयांपर्यंतचा महसूल प्राप्त होतो़ महिनाभरापासून ही टपालसेवा बंद असल्याने येथील टपाल कार्यालयाच्या सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांचा महसल बुडाला आहे़रेल्वेच्या टपाल सेवेच्या माध्यमातून आॅनलाईन जलद गतीने टपाल पोहचते केले जातात़ त्यामुळे रेल्वे विभागाची टपालसेवा वापरणाºया ग्राहकांची संख्या अधिक आहे़ प्रत्येक तीन महिन्याला या टपाल कार्यालयास पासवर्ड दिला जातो़ तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वीच या कार्यालयातून पासवर्ड मागणी करण्यात आली होती़ टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने हा पासवर्डही उपलब्ध करून दिला; परंतु, नेटवर्क मिळत नसल्याने फाईल तयार होत नाहीत़ परिणामी नवीन बुकींग ठप्प पडली आहे़टपाल कार्यालयात नवीन बुकींग बंद असली तरी बाहेरगावाहून येणारे टपाल वितरित करण्याचे काम सुरू आहे़ त्यावर कुठलाही परिणाम झाला नाही़ त्याचप्रमाणे किरकोळ टपाल आॅर्डरही स्वीकारल्या जातात़ केवळ आॅनलाईनची कामे ठप्प आहेत़ मात्र मागील काही वर्षांपासून आॅनलाईन टपाल पाठविणाºया ग्राहकांचीच संख्या अधिक असल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ येथील टपाल सेवा तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेInternetइंटरनेट