शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी ;आत्मदहनाच्या प्रयत्नातील शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:40 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावांतील ७६ शेतकºयांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ७६ शेतकºयांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी वर्षभरापासून या शेतकºयांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत; परंतु, याबाबत कारवाई झाली नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकºयांनी १ जून रोजी जायकवाडी प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हा कचेरी परिसरात आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आत्मदहनाचा इशारा देणाºया शेतकºयांचा पोलीस शोध घेत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकरी हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. हे शेतकरी जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेट जवळ आले असता नवा मोंढा पोलिसांनी त्यांना अडविले व त्यांच्याकडून पेट्रोलची कॅन, कीटकनाशके व अन्य साहित्य जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले.संबर येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१३-१४ या वर्षात तर पिंपळगाव टोंग येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१४ मध्ये झाले आहेत. खाजगी वाटाघाटीद्वारे संबंधितांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. १२ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकºयांची मागणी आहे; परंतु, २०१५ चा निर्णय होण्यापूर्वीच या शेतकºयांच्या जमिनीच्या खरेदीखताचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. या संदर्भात बैठक घेऊन व पत्राद्वारे त्यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी