शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळूमाफियांच्या टोळीला पोलीस अधीक्षकांनी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:40 IST

वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़१५ सप्टेंबर २०१८ रोजी बामणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर या टोळीने त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला़ त्यात सहायक पोलीस निरीक्षक व काही कर्मचारी जखमी झाले होते़ या प्रकरणी वाळूमाफियांविरूद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील आरोपी भगवान सखाराम मते, गजानन फकीरा मानकरी, अशोक गोरख मते, गजानन वामन वटाणे, सखाराम किशन मते, अशोक मोहन रेवाळे, मनोहर मदन रेवाळे, सुनील महादू वटाणे, मोहसीन फेरोज बेग आणि ज्ञानेश्वर प्रल्हाद खुपसे यांच्या टोळीच्या गुन्ह्यांची अभिलेख पडताळणी केली असता, विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे या टोळीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी २७ जून २०१९ रोजी सुनावणी घेतली़ त्यात टोळीप्रमुख भगवान मते, टोळी सदस्य गजानन फकीरा मानकरी, आकाश गोरख मते, गजानन वामन वटाणे, ज्ञानेश्वर प्रल्हाद खुपसे यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी तर अशोक मनोहर रेवाळे, मनोहर मदन रेवाळे, मोहसीन बेग फेरोज बेग यांना ९ महिन्यांसाठी परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, जिंतूर तालुक्यालगत असलेल्या जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, आष्टी, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सेनगाव, वसमत या तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले़त्यानुसार ३ आॅगस्ट रोजी बामणी पोलिसांनी या आरोपींना प्रतिबंधित क्षेत्रातून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूPoliceपोलिस