शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

परभणी : जप्त वाहनांमुळे पोलीस ठाणे फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 23:24 IST

संचारबंदीच्या काळात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असून, या काळात जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत़ सद्यस्थितीला शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे १७५ वाहने पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत़ परिणामी ठाण्यांचा परिसर वाहनांमुळे फुल्ल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संचारबंदीच्या काळात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असून, या काळात जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत़ सद्यस्थितीला शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे १७५ वाहने पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत़ परिणामी ठाण्यांचा परिसर वाहनांमुळे फुल्ल झाला आहे़कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़ असे असतानाही छोट्या मोठ्या कामांचे निमित्त काढून नागरिक शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाने ८ दिवसांपासून कडक पावले उचलली आहेत़ सकाळी ७ ते १० हा वेळ अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आला आहे़ त्यानंतर मात्र शहरातील रस्त्या-रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे़प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, त्यात अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त फिरत असणाºया नागरिकांवर थेट कारवाई केली जात आहे़ वाहनधारकांचे ओळखपत्र तपासून त्यांचा वाहन क्रमांक नोंद करून घेतला जात आहे़ या प्रकारामुळे नागरिकांत आता धास्ती निर्माण झाली आहे़ पोलिसांनी नागरिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे़ दररोज दिवसभरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ४ ते ५ वाहने जप्त केली जात आहेत़ ८ दिवसांच्या या काळात सुमारे १७५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़ त्यात चार चाकी, आॅटोरिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे़विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत़ जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये लावली जात आहेत़ त्यामुळे पोलीस ठाण्यांचा परिसर जप्त वाहनांनी व्यापून गेला आहे़ दररोज जप्त वाहनांची संख्या वाढत आहे़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी घरात थांबणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे़; परंतु, नागरिक त्यास गांभिर्याने घेत नाहीत़ नागरिकांच्या आरोग्यासाठीच शासन आणि प्रशासनाने संचारबंदीची सुरुवात केली आहे़ मात्र अनेकांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याने आदेश धुडकावून छोट्या छोट्या कामांसाठीही घराबाहेर पडण्याचे प्रकार घडत आहेत़विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी कायदा, केंद्र शासनाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा यासारखे गंभीर लागू असतानाही नागरिक मात्र फारसे गांभिर्याने घेत नसल्याने पोलिसांना कारवाईचे हत्यार उपसावे लागत आहे़ शहराच्या विविध भागांत नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे़ नागरिकांच्या आरोग्यासाठीच पोलीस यंत्रणा घरदार सोडून रस्त्यांवर उभे राहून आणि प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून उपाययोजना करीत आहेत़ असे असताना काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.एकाच दिवशी २० गाड्या पकडल्या४नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस कर्मचाºयांनी विनाकारण फिरणाºया २० गाड्या ११ एप्रिल रोजी जप्त केल्या आहेत़ त्यामध्ये एमएच २२ एएल-८१३९, एमएच २२ एजे-२१८३, एमएच ३८ आर ७७५, एमएच २२ एसी- ५८५, एमएच २२ एसी-५५५८, एमएच २२ एएस- ७९५४ आणि एक विना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली़ या व्यतिरिक्त १३ वाहने नवा मोंढा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली़नाकाबंदीत जप्त केली वाहनेग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी ११ एप्रिल रोजी पाथरी रोडवरील पेट्रोल पंप परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली़ यात ८ वाहने जप्त केली आहेत़ त्यामध्ये ५ मोटारसायकल, एक कार आणि दोन मालवाहू वाहनांचा समावेश आहे़नानलपेठ पोलीस ठाण्यात १०० हून अधिक वाहने४शहरात ४ पोलीस ठाण्यांची हद्द येते. त्यात नानलपेठ पोलीस ठाण्याने सर्वाधिक १०० पेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी वाहने जप्त केली आहेत़ ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच लावली असून, आता वाहने उभी करण्यासाठी जागाही शिल्लक राहिली नाही़ कोतवाली पोलीस ठाण्यात २१ दुचाकी, ३ आॅटोरिक्षा आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत़ नवा मोंढा पोलीस ठाण्यात आतापर्यंत २४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत़ कोतवाली पोलीस ठाण्यातील जप्त केलेल्या वाहनांची संख्याही दोन आकडी आहे़ त्यामुळे चारही पोलीस ठाण्यांचा परिसर वाहनांनी फुल्ल झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या