शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाच्या मदतीला धावले परभणी पोलीस; तत्परतेने मिळवून दिली प्रमाणपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 19:25 IST

वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

ठळक मुद्देअफगाणिस्तानातील काबुल येथील महंमद नासेर बजुनी हा परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काबुल येथे त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. १४ जानेवारी रोजी रविवार आणि मकरसंक्रातीचा सण असल्याने या विदेशी विद्यार्थ्यास त्याच्या मायदेशी  परतण्यासाठी परवानगी पत्र देणे अवघड काम होते.विद्यार्थ्याचे दु:ख व त्याची घरी परतण्याची गरज लक्षात घेऊन संबंधित पोलीस अधिकार्‍याला तातडीने बोलाविण्यात आले.

परभणी : वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

अफगाणिस्तानातील काबुल येथील महंमद नासेर बजुनी हा परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे. येथील आंतराष्ट्रीय वसतिगृहात तो वास्तव्याला आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काबुल येथे त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. ही दु:खद वार्ता दुपारी महमद नासेर याला समजली. त्यानंतर त्याने विद्यापीठ प्रशासनाकडे सुटीचा अर्ज केला. विद्यापीठ प्रशासनानेही पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी रविवार आणि मकरसंक्रातीचा सण असल्याने या विदेशी विद्यार्थ्यास त्याच्या मायदेशी  परतण्यासाठी परवानगी पत्र देणे अवघड काम होते. तरीही विद्यापीठाचे आर.व्ही. चव्हाण हे या विद्यार्थ्याला घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. मात्र येथील पारपत्र, परकीय नोंदणी कक्ष बंद होता.

विद्यार्थ्याचे दु:ख व त्याची घरी परतण्याची गरज लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍याला तातडीने बोलाविण्यात आले. पोलीस नाईक आशा पंडितराव सावंत यांनी सण बाजुला सारुन कार्यालय गाठले. तसेच सहकारी कर्मचारी मोहनसिंग लाड यांनाही बोलावून घेतले. दोघांनी या विद्यार्थ्याच्या परतीच्या परवानगीचे अर्ज तयार करुन आॅनलाईन दाखल केले. या अर्जांवर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बी.एल. देशमुख यांच्यासह पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या घरी जावून त्यांचीही स्वाक्षरी घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्याच्या परवानगीचा अर्ज पूर्ण झाला आणि त्यामुळे गावी जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. सायंकाळी नंदीग्राम एक्सप्रेसने हा विद्यार्थी मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबईहून तो दिल्लीला जाणार असून, दिल्ली येथून विमानाने तो काबुलला जाणार आहे. पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या माणुसकीमुळे महंमद नासेर याला सोमवारी सायंकाळपर्यंत काबुल पोहचून आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी पोहचता येणार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थी