परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम राबविली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ३१० इसमांना त्यांच्या राहत्या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
विसर्जन कालावधीपर्यंत विविध ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. यामध्ये २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीसाठी जिल्ह्यातील एकूण ३१० व्यक्तींना त्यांच्या तालुक्यामधून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच ६३२ व्यक्तींवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गंगाखेड ६९, सोनपेठ ५८, मानवत ४०, पिंपळदरी २७, सेलू २७, जिंतूर २१, ताडकळस १७, पाथरी १४, परभणी ग्रामीण १३, कोतवाली ८, चुडावा हद्दीतून ८ व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.
या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि अंमलदार ज्योती चौरे यांनी विशेष भूमिका बजावली.