शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पोलीस वसाहतीची दूरवस्था : पोलिसांचेच कुटूंबिय असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:15 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला मात्र वेळ नसल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला मात्र वेळ नसल्याचे दिसत आहे़येथील नानलपेठ भागात पोलीस कर्मचाºयांच्या कुटूंबियांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत़ पोलीस मुख्यालयाच्या परिसरात उभारलेल्या या निवासस्थानांमध्ये सध्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे़ जुनाट झालेली घरे, वर्षानुवर्षापासून डागडुजी नसल्याने जागोजागी गळणारे छत या अंतर्गत समस्यांबरोबरच वसाहतींमधील रस्त्यांवर साचलेला चिखल आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने मिळणारे अशुद्ध पाणी यामुळे पोलीस कुटूंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ शहरी भागात राहूनही महापालिकेचे या वसाहतीकडे दुर्लक्ष होत आहे़ आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, घरापर्यंत जाणेही कठीण होत आहे़ याशिवाय पिण्याचे पाणी, पथदिवे या समस्या कर्मचाºयांच्या कुटूंबियांना त्रासदायक ठरत आहेत़ कर्मचारी निवासस्थानांची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही़ त्यामुळे या निवासस्थानांवर चक्क झाडांनीच कब्जा केला आहे़ झाडांच्या मुळांमुळे निवासस्थाने अधिकच धोकादायक बनली आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बांधकाम विभाग प्रतिसाद देत नसल्याने आहे त्या अवस्थेत दिवस काढण्याची वेळ कर्मचाºयांवर आली आहे़ प्रशासनाने या भागात सुविधा पुरवाव्यात आणि पोलीस कर्मचारी कुटूंबियांच्या आरोग्याचे प्रश्नही सोडवावेत, अशी मागणी होत आहे़२० वर्षांपासून दुरुस्ती नाहीदेखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे़ वारंवार पत्रव्यवहार करूनही हा विभाग प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत़ १९९८ मध्ये या परिसराची डागडुजी करण्यात आली होती़ त्यानंतर मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत दुरुस्ती करण्यात आली नाही़ त्यामुळे वसाहतीतील समस्यांमध्ये वाढ झाली आहे़जलवाहिनीला : जागोजागी गळतीपोलीस मुख्यालयामध्ये कर्मचाºयांसाठी असलेल्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ तसेच वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीही फुटल्याने हे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि कर्मचारी कुटूंबियांना दूषित पाणी पुरवठा होत आहे़ यामुळे साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे़ पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर होते़ महापालिकेने वसाहत परिसरात फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने वसाहतीतील प्रत्येक इमारतींवर सांड पाणी वाहून नेणारे पाईप बदलून नवीन पाईप टाकावेत, अशी या कर्मचारी कुटूंबियांची मागणी आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस