शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

परभणी : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:34 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे़शर्मा ट्रॅव्हल्सने लातूर ते कोल्हापूर प्रवास करीत असताना एका महिलेच्या बॅगमधील २५ तोळे सोने आणि १ लाख ४९ हजार रुपये चोरल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता़ या प्रकरणात खुशाल सोमनाथ पवार (रा़ कमलापूर ता़ पूर्णा) याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले़ कोल्हापूर पोलिसांनी अनेक वेळा परभणी जिल्ह्यात या आरोपीचा शोध घेतला़ परंतु, तो हाती लागला नाही़ खुशाल पवार याने बीड जिल्ह्यातही अनेक गुन्हे केले असल्याने बीड पोलीसही त्याच्या शोध घेत होते़ दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी या आरोपीची माहिती घेतली़ तेव्हा हा आरोपी गंगाखेड येथे येणार असल्याचे स्पष्ट झाले़ त्यावरून ८ जून रोजी स्थागुशाचे पथक गंगाखेड येथे रवाना करण्यात आले़ गंगाखेड बसस्थानकावर पहाटेपासूनच सापळा लावण्यात आला़ दरम्यान, खुशाल सोमनाथ पवार यास पथकाने ताब्यात घेतले़ त्याच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता, त्याने कबुली दिली आहे़ या आरोपीस पुढील तपास कामी लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, उद्धव सातपुते, शंभूदेव राख, लक्ष्मीकांत धृतराज, सुरेश डोंगरे, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, सय्यद मोईन, संजय घुगे, राजेश आगासे, दिलावर पठाण, राम घुले यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी