शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी पोलिसांची कारवाई; बारा जणांविरुद्ध मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:06 IST

येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.धुलीवंदनाच्या निमित्ताने शहरात मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी किरणसिंग करमाडसिंग जुन्नी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संतोष बापूराव गुजर, सुनील लक्ष्मण शिराळे, रामा बापूराव गुजर, रवि प्रकाशराव गुजर, किरण रामा गुजर, अर्जुन संतोष गुजर, अंबादास रामा गुजर, दीपक प्रकाश गुजर, शेख मतीन शेख शफी, आकाश शेषराव गुजर, भानुदास रामा गुजर आणि मोहन शेषराव गुजर यांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला होता. संतोष गुजर याची गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन नवीन सदस्यांना या टोळीत सहभागी करुन घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच संतोष गुजर याच्याविरुद्ध २० वर्षामध्ये ४७ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये टोळी प्रमुख संतोष गुजर व इतर सदस्यांना कलम ५५ अन्वये हद्दपारही केले होते.दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, मारहाण, बलात्कार असे गंभीर गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल असल्याने त्याची दखल घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याचे कलम ३ (१) ३ (२) ३(४) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.परभणी जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करण्यासाठी मोक्का कायद्यांतर्गत केलेली ही तिसरी कारवाई ठरली आहे. यापूर्वी पूर्णा येथील टोळीप्रमुख सोमनाथ सोलव याच्या टोळीतील २१ आरोपी, चारठाणा येथील टोळीप्रमुख हरिश सुभाष पवार याच्या टोळीतील ८ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोन्ही गुन्ह्यातील आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी