शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २५ वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:51 IST

नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़३१ डिसेंबर रोजी जिल्हाभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ हा जल्लोष साजरा करीत असताना युवकांचा उत्साह शिगेला पोहचला होता़ या उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविल्या प्रकरणी परभणी शहर वाहतूक शाखेने तब्बल २५ वाहनधारकांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत़ ३१ डिसेंबर रोजी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता़ प्रत्येक पोलीस ठाण्यातील ८० टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ड्युटी देण्यात आली होती़ तसेच ठिक ठिकाणी गस्तही घालण्यात आली़ नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होवू नये, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविला होता़ परभणी शहरात शहर वाहतूक शाखेच्या पथकाने २१ वाहनचालकांवर कारवाई केली आहे़ ट्रिपलसीट वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे पालम, सेलू आणि मानवत या तीन पोलीस ठाण्यााच्या हद्दीत प्रत्येकी १ कारवाई करण्यात आली आहे़ पूर्णा शहरात ताडकळस टी पॉर्इंटवर पोलिसांनी एका वाहन चालकाविरूद्ध कारवाई केली असून, परवाना नसताना वाहन चालविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे़विनापरवाना दारू विक्री४वाहनधारकांविरूद्ध कारवाई बरोबरच पोलिसांनी विनापरवाना दारू विक्री करणाºया दोघांविरूद्ध कारवाई केली आहे़ पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या दारूची चोरटी विक्री करीत असताना एका आरोपीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ नामदेव मारोतराव डुबे असे आरोपीचे नाव आहे़ त्याच्या ताब्यातून १२७० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़ गंगाखेड शहरात अवैधरित्या दारू विक्री करणाºया एका महिलेविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, या महिलेच्या ताब्यातून २५० रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे़डंÑक अँड ड्राईव्हच्या केसेस४३१ डिसेंबर रोजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत २० दुचाकी चालक, १ आॅटोरिक्षा आणि १ टिप्पर अशा २२ वाहनांवर कारवाई केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीNew Yearनववर्षPoliceपोलिसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह