शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:04 IST

तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्री येथे ३ जून रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान तालुक्यातील कोद्री येथील आकाश शिवाजी सावंत यांच्या बँड पथकाला वाजंत्रीचे काम देण्यात आले होते. वाजंत्री म्हणून वाद्य घेऊन पिंप्री येथे आलेल्या बँड पथकातील आकाश शिवाजी सावंत, अविनाश नारायण ढेंगळे, अजय आनंद हनवते, विकास बलभीम किरवले, सूरज जगतकर, दत्ता प्रकाश सावंत, पवन रोडे, उत्तम शिवाजी सावंत, धुराजी खांडेकर, अनिकेत शिवाजी सावंत, शुभम शिवाजी सावंत हे मिरवणुकीमध्ये वाद्य वाजवित असताना रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गोविंद मुठाळ व इतरांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे गाणे वाजविण्यास सांगितले. एकाच वेळी दोन गाणे वाजविणे शक्य नाही, कोणते एक गाणे वाजवायचे ते सांगा, असे प्रितम सावंत याने सांगितले. तेव्हा गोविंद मुठाळ व त्याच्या सोबतच्या व्यक्तींनी त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. मिरवणूक संपवून बँड पथकातील वाजंत्री रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आॅटोने गंगाखेडकडे जाण्यास निघाले. त्यावेळी पिंप्री शिवारात रस्त्यावर दगड टाकून वाजंत्रीचा आॅटोरिक्षा आडवून गोविंद मुठाळ, बाळू मुठाळ, अंकूश भिसे, किरण दिगंबर भिसे, माऊली भास्कर भिसे, शिवप्रसाद रामचंद्र भिसे, बालाजी जनार्दन भिसे, विष्णू मोतीराम भिसे, दयानंद भिसे, लल्लू प्रकाश भिसे, नामदेव मुंजाजी भिसे (सर्व रा.पिंप्री) व इतर ५ जणांनी लाकडी दांड्याने पथकातील वाजंत्रीना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. आॅटोरिक्षा (एमएच २५ एम १३३२) व बँडच्या सामानाची नासधूस केली. यात ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आकाश सावंत यांनी दिली आहे. त्यावरुन ६ जून रोजी सायंकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले, सपोनि राजेश राठोड हे करीत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस