शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:51 IST

तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़पिंपळा लोखंडे या गावात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ यावर्षीही गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे दररोज ४८ हजार लिटर पाण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीपासून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या गावाला पाणीपुरवठा केला जातो़ या टँकरची क्षमता ८ हजार लिटर असून, दिवसांतून २ फेऱ्या केल्या जातात़ मात्र रात्रीच्या वेळी टँकर चालक टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ याबाबत तालुका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठ्यात वाढ होत नसल्याने सोमवारी महिलांसह गावातील ५०० ग्रामस्थांनी तहसीलवर धडक मोर्चा काढला़माजी सरपंच तुकाराम लोखंडे, अ‍ॅड़ बालाजी लोखंडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार श्याम मदनूरकर यांना पाण्याच्या वाढीव पुरवठ्याबाबत निवेदन देण्यात आले़ याबाबत तहसीलदारांनी लवकरच वाढीव पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाagitationआंदोलनwater scarcityपाणी टंचाई