शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:16 PM

जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातून दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १५.३१ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागत आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ६५८ शेतकºयांना ६४ कोटी ७० लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ६५८ शेतकºयांना २७ कोटी ७ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७१ शेतकºयांना ४२ कोटी ४१ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २८ हजार ८४१ शेतकºयांना ९० कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांना सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.गतवर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी घटले कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामामध्ये १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले आहे; परंतु, १५ आॅगस्टपर्यंत केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आतापर्यंत २३.१५ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप घटले आहे. दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना बँकांकडून मदत करताना आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर गतवर्षीच्या व यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक