शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

परभणी : पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:46 IST

खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८०३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७ कोटी ५९ लाख ७४ हजार २५३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले असून, पिकांसाठी विमा लागू केला आहे़ यावर्षी जिल्ह्यात पीक विमा काढणाºया शेतकºयांची संख्याही मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८०३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७ कोटी ५९ लाख ७४ हजार २५३ रुपये विमा कंपनीकडे जमा केले असून, पिकांसाठी विमा लागू केला आहे़ यावर्षी जिल्ह्यात पीक विमा काढणाºया शेतकºयांची संख्याही मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसत आहे़जून महिन्यापासून खरीप हंगामाला सुरुवात होते़ जिल्ह्यात सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीपातील सर्व पेरण्या उरकून घेतल्या जातात़ मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपातील पेरण्याच रखडल्या होत्या़ जून महिन्यात झालेल्या अल्प पावसावर काही शेतकºयांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत़ मात्र पेरण्यानंतरही पाऊस झाला नाही़ त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दोलायमान झाली आहे़ यावर्षी जिल्ह्यातील पीक विम्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडे काम देण्यात आले आहे़ १ जूनपासून विमा उतरविण्यास सुरुवात झाली असून, आपले सरकार सेवा केंद्र, बँका आणि वैयक्तीक शेतकरीही आॅनलाईन पद्धतीने विमा भरू शकतात़ सातबारा होल्डींग, पीक पेरा उतारा, बँकेचे पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रांच्या आधारावर शेतकरी आपल्या शेतात पेरलेल्या पिकांचा विमा काढू शकतो़यावर्षी शेतकºयांनी पीक विमा काढण्यासाठी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे़जिल्ह्यात साधारणत: ३ लाख २४ हजार शेतकरी आहेत़ प्रत्येक पिकाचा विमा उतरविला जातो़ दोन वर्षापूर्वी ७ लाख शेतकºयांनी विमा उतरविला आहे़ मात्र यावर्षी १९ जुलैपर्यंत केवळ १ लाख ८२ हजार ५९५ शेतकºयांनीच आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे़या विम्यापोटी ७ कोटी ५९ लाख ७४ हजार २५३ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे़ दोन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ पिकांचे उत्पादन हाती येत नाही़त्यामुळे विमा काढण्यासाठी शेतकºयांची गर्दी होणे अपेक्षित आहे़ मात्र १९ जुलैपर्यंतची आकडेवारी पाहता केवळ पावणेदोन लाख शेतकºयांनीच विमा काढला आहे़ यापूर्वीच्या विमा कंपन्यांनी शेतकºयांची फसवणूक केली, अशी भावना जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये आहे़ शिवाय अनेक शेतकºयांनी पावसाअभावी पेरा केला नाही़ त्याचा परिणाम विमा उतरविण्यावर झाला आहे़निकषात बदल करापीक विमा देताना राज्य शासनाने घातलेले निकष जाचक आहेत़ या निकषामध्ये नुकसान झाल्यानंतरही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पीक विम्याचे निकष शिथिल करावेत आणि सरसकट नुकसानग्रस्त शेतकºयांना पीक विमा मिळवून देण्याची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे़सीएससी केंद्रावरूनच उतरविला सर्वाधिक विमाआपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक आणि शेतकरी स्वत: आॅनलाईन पद्धतीने विमा उतरवू शकतात़ आपले सरकार सेवा केंद्रावरूनच अधिकाधिक शेतकºयांनी विमा उतरविला आहे़ १९ जुलैपर्यंत १ लाख ७४ हजार ३८५ शेतकºयांनी सीएससी केंद्रावरून विमा उतरवित विमा कंपनीकडे ७ कोटी ४८ लाख ४६ हजार ६१२ रुपयांचा विमा हप्ता जमा केला आहे़ तर बँकांमधून विमा उतरविणाºया शेतकºयांची संख्या अवघी ३४० असून, या शेतकºयांनी १० लाख ८३ हजार ९१० रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे़ ७८ शेतकºयांनी स्वत:हून विमा उतरवित ४३ हजार ७३० रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे़सलग तिसºया वर्षी बदलली कंपनीच्प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांना यापूर्वी पीक विमा कंपनीकडून नुकसान सहन करावे लागले आहे़ दोन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना विमा कंपनीने मात्र कृषी विभागातील अधिकाºयांना हाताशी धरून अनेक शेतकºयांना विम्याच्या रकमेपासून वंचित ठेवले आहे़च्त्यामुळे पीक हातात पडले नसतानाही कंपनीकडूनही शेतकºयांना दिलासा मिळाला नाही़ त्यामुळे विमा कंपनीवरही शेतकºयांचा विश्वास उडाला आहे़ त्यातच दोन वर्षापूर्वी रिलायन्स पीक विमा कंपनी, मागील वर्षी इफ्को टोकियो विमा कंपनी आणि आता भारतीय कृषी विमा कंपनीकडे जिल्ह्याच्या पीकविम्याची जबाबदारी दिली आहे़च्शासनाने विमा कंपन्यांत केलेला बदलच कंपन्यांकडून फसवणूक झालेल्या बाबीला पुष्टी देणारा आहे़ त्यामुळे यावर्षी तरी कंपनीने योग्य मूल्यमापन करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़मुदत वाढवून देण्याची शेतकºयांची मागणी४जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस नसल्याने पेरण्या करण्यासाठी विलंब लागला़ त्यामुळे पेरलेल्या पिकांचा विमा काढण्यासाठी अत्यंत कमी कालावधी शेतकºयांच्या हातात आहे़४२४ जुलै ही विमा काढण्याची अंतीम तारीख असून, शेतकºयांच्या हातात केवळ ३ दिवस आहेत़ अनेक शेतकºयांनी अजूनही विमा उतरविलेला नाही़४शेतकºयांची संख्या लक्षात घेता विमा काढण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी