शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बंगळुरू रेल्वे गाडीत प्रवाशाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:44 IST

परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मिरखेल रेल्वेस्थानकावर क्रॉसिंगसाठी बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी थांबली होती. या गाडीत नेहमीच प्रवाशांची संख्या कमी असते. याच गाडीत पूर्णा येथील सईदा बेगम मो. युसूफ व त्यांचा मुलगा मो. अबरार व अन्य काही प्रवासी प्रवास करीत होते. याच दरम्यान, एका चोरट्याने गाडी रेल्वेस्थानकावरून सुटताच समोर बसलेल्या सईदा बेगम व अन्य एका महिलेच्या गळ्यावर हात मारला. यामध्ये सईदा बेगम यांचे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीचे गंठण आले. दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ तुटून गाडीतच पडली. तेव्हा चोरट्याने चालत्या गाडीतून उडी मारून पोबारा केला. प्रवासी महिलेने रेल्वे महामार्ग पोलीस चौकी येथे येऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे