शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

परभणी महानगरपालिकेत एकमताने ठराव पारित : निवासासाठी उठविले खेळाच्या मैैदानाचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:38 IST

राष्टÑीय महामार्गावर शहरातील जिंतूररोडलगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही जागा आता निवासस्थानांच्या नावाखाली आर्थिक उलाढालीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्टÑीय महामार्गावर शहरातील जिंतूररोडलगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही जागा आता निवासस्थानांच्या नावाखाली आर्थिक उलाढालीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.३ नोव्हेंबर रोजी तहकूब झालेली मनपाची सर्वसाधारण सभा सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात पार पडली. महापौर मीना वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपमहापौर माजूलाला, आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव सय्यद इम्रान यांची उपस्थिती होती.या सभेत मागील इतिवृत्तांताच्या वाचनाबरोबरच खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठविण्याचा विषय, विषय पत्रिकेवर घेतला होता. विषय क्रमांक ४५ नुसार परभणी शहरातील जिंतूररोडवर सर्वे नं.५७७ मध्ये ज्ञानोपासक महाविद्यालयाचे खेळाचे मैदान आहे. या ठिकाणी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच माजी खा.गणेशराव दुधगावकर यांचे संपर्क कार्यालय आहे. हे मैदान रहिवासी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास मंजुरी द्यावी, असा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चा करताना नगरसेवक सचिन देशमुख वगळता एकाही नगरसेवकाने आक्षेप घेतला नाही किंवा चर्चाही केली नाही. त्यामुळे हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.जिंतूररोडवर ज्ञानोपासक महाविद्यालयाचे मैदान असून या मैदानावर विद्यार्थी विविध खेळांचा सराव करतात. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांच्या सभा, छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमही येथे होतात. विकास आराखड्यामध्ये ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे. २७११.५० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाची ही जागा असून दिलीप वसमतकर व सुरेश शर्मा हे या जागेचे मूळ मालक आहेत. आता ही जागा ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मालकी हक्कात आहे. महाविद्यालयाच्या पत्रानुसार महानगरपालिकेने ही जागा खेळासाठी आरक्षित केली असल्याचे आयुक्त राहुल रेखावार यांनी सांगितले. हा ठराव चर्चेला आल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.या ठरावावर १० मिनिटांचीच चर्चा झाली. केवळ नगरसेवक सचिन देशमुख यांनीच यावर आक्षेप घेतला. दिवसेंदिवस शहराची व्याप्ती वाढत आहे. शहरामध्ये खेळाची मैदाने उपलब्ध नाहीत. महानगरपालिकेलाच अग्नीशमन दल, नाट्यगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये आरक्षण उठवून ती जागा निवासस्थानासाठी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करीत हा ठराव मला मान्य नाही, असे सभागृहाला स्पष्ट सांगितले. मात्र त्यांचा विरोध हा एकाकी पडला आणि ठरावाला मंजुरी देण्यात आली.