शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : लोकसहभागातून वाढविल्या पांगरी शाळेत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:51 IST

बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे.तालुक्यातील पांगरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा पुढाकार व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावातील शिक्षणप्रेमी तरुणांच्या सहकार्याने शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी लोकसहभागातून २ लाख ७५ हजारांचा निधी उभारण्यात आला. या निधीतून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण, रंगरंगोटी व वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्याच बरोबर शाळेत डिजीटल हॉल, वाचनालय, बचत बँक व क्रीडा विभागाची निर्मिती करण्यात आली. या भौतिक सुविधांमुळे व शिक्षकांच्या परिणामकारक अध्यापनामुळे पाहता पाहता शाळा गावचे आकर्षण बनली. ेभरीस भर म्हणून गावातील पंढरीनाथ देवस्थान समितीने शाळेला २५ हजार रुपयांचा निधी देऊन प्रवेशद्वारासह सुंदर कमान बनवून दिली. ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेत पाण्याच्या सुविधेसह क्रीडांगण तयार करून दिले. शाळेचे पालटलेले रूप पाहून इंग्रजी शाळेत शिकायला जाणारे विद्यार्थी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत.शिक्षण विभागाने केला शाळेचा गौरव२०१६-१७ यावर्षी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बारा विद्यार्थ्यांनी पांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यशाचा वाढता आलेख पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी