शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालमचे नायब तहसीलदार अनिल घनसावंत निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:36 IST

पालम येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला नसल्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अनिल घनसावंत यांना निलंबित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला नसल्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अनिल घनसावंत यांना निलंबित केले आहे.पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात १२०० क्विंटल धान्याचा घोटाळा झाल्याची बाब डिसेंबर महिन्यात मुंबईतील पथकाच्या तपासणीनंतर उघडकीस आली होती. या प्रकरणी नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांची विभागीय चौकशी सुरु आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकामार्फत या गोदामाची तपासणी करण्याकरीता अधिकारी आले असता गोदामपाल मस्के उपस्थित नसल्याने तपासणी करता आली नाही. तसा पंचनामाही अधिकाऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर परभणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांची पालम येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे पुरवठा विभागाचा पदभार देण्यात आला होता; परंतु, पेठशिवणीच्या पुरवठा विभागाच्या गोदामाची पूर्ण तपासणी झाली नसल्याने याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर पदभार घेतो, असे घनसावंत यांनी सांगितले व पदभार स्वीकारला नाही. याबाबत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा मागितला होता. घनसावंत यांनी खुलासा दिल्यानंतर तो जिल्हाधिकाºयांनी नामंजूर करुन घनसावंत यांना निलंबित केल्याचे आदेश १२ एप्रिल रोजी काढले आहेत.धान्य घोटाळ्याचा आकडा वाढण्याची भीती४नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, पेठशिवणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात १२०० क्विंटल धान्याचा घोटाळा उघडकीस आला होता; परंतु, या गोदामाची अद्याप पूर्ण तपासणी झाली नाही. त्यामुळे उघडकीस आलेल्या घोटाळ्या व्यतिरिक्त या धान्याचा आकडा ८०० क्विंटलपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच तीन ते चार वाहनांतील धान्य गोदामात न आणता परस्पर काळ्या बाजारात विकल्याचे ऐकिवात आहे. अशा स्थितीत पुरवठा विभागाचा पदभार माझ्याकडे दिल्यास काहीही संबंध नसताना आपला बळी जावू शकतो. तसेच अपहाराचे ५० ते ६० लाख रुपये विनाकारण भरावे लागत असल्यास आत्महत्येशिवाय इतर कुठलाही पर्याय राहणार नाही. त्यामुळे जोपर्यंत सर्व अभिलेखांची तपासणी होणार नाही, तोपर्यंत पदभार स्वीकारण्यास नकार देत आहे, असेही घनसावंत यांनी खुलाश्यात म्हटले आहे. हा खुलासा जिल्हाधिकाºयांनी फेटाळला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदारcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग