शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परभणी : प्रवासी दादऱ्याच्या कामाला मिळेना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:53 IST

येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़दोन वर्षापूर्वी मुंबई येथे अरुंद दादºयावरून रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत असताना चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्थानकावरील दादऱ्यांची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेतला़ दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणारे परभणी हे आदर्श रेल्वेस्थानक आहे़ दररोज सुमारे ८० रेल्वे गाड्यांची या मार्गावरून वर्दळ आहे़ दिवसभरात शेकडो प्रवासी परभणी स्थानकावरून प्रवास करतात़ मात्र या स्थानकावर असलेला दादरा अरुंद आहे़ अधिक रुंदीचा दादराही या रेल्वेस्थानकावर असला तरी तो प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर आहे़ परिणामी अरुंद दादºयाचाच सर्वाधिक वापर होतो़ त्यामुळे या दादºयावर अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नवीन दादरा उभारणीच्या कामाला मंजुरी मिळाली़ साधारणत: सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभही झाला़ रेल्वेस्थानकावरील विद्यापीठ गेटच्या बाजुने दादरा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे़ सुरुवातीच्या काळात या कामाला बºयापैकी गती होती़ त्यामुळे निश्चित केलेल्या मुदतीत दादºयाचे काम पूर्ण होईल, अशी प्रवाशांना अपेक्षा होती़ मात्र कालांतराने या कामाची गती मंदावली़ सद्यस्थितीला चार दिवसांपासून हे बंद झाले आहे़ या गतीने जर दादºयाचे काम होत असेल तर मुदतीत पूर्ण होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता दादºयाच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़ दररोज हजारो प्रवासी अरुंद दादºयाचा दाटीवाटीने वापर करतात़ रेल्वे गाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दिशेने येण्यासाठी प्रवाशांना अर्धा-अर्धा तास ताटकळत थांबावे लागत आहे़ ही गैरसोय दूर करण्यासाठी नवीन दादºयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़दुहेरीकरणानंतर दादºयाचा वापर वाढला४परभणी रेल्वेस्थानकावरून नांदेडकडे जाणाºया प्रवाशांच्या तुलनेत मनमाड, मुंबई, औरंगाबादकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे़ या स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म आहेत़ मिरखेल ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर तीनही प्लॅटफॉर्मचा पूर्ण क्षमतेने वापर केला जात आहे़ मनमाडच्या दिशेने जाणाºया रेल्वे गाड्या कायमस्वरुपी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविल्या जातात़ तर नांदेडकडे जाणाºया रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर थांबवितात़ त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ चा वापर वाढला आहे़ मात्र प्रवाशांना त्यासाठी जुन्याच दादºयाचा सहारा घ्यावा लागतो़ हा दादरा ३़५ मीटर रुंदीचा असून, तो प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे़ त्यामुळे नवीन दादरा हा साडेपाच मीटर रुंदीचा तयार केला जात आहे़ प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नवीन दादºयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़थेट स्थानकाबाहेर पडण्याची सुविधायेथील रेल्वेस्थानकावर नव्याने तयार करण्यात येणारा दादरा प्रवाशांसाठी निश्चित सोयीचा होणार आहे़ या दादºयावरून प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि रेल्वेस्थानकाच्या पलीकडील बाजुस जाण्याची सुविधा करण्यात आली आहे़विशेष म्हणजे, रेल्वे गाडीने आलेल्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वाराचा वापर न करता थेट स्थानकाच्या बाहेर पडण्याची सुविधाही केली जात आहे़ त्यामुळे हा दादरा प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार असून, अनेक वृद्ध प्रवासी तसेच महिला प्रवाशांची सद्यस्थितीला होत असलेली गैरसोय दूर होणार आहे़सरकता जीना, लिफ्ट गैरसोयीचीरेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी काही महिन्यांपूर्वी सरकता जीना आणि लिफ्टची सुविधा निर्माण करून देण्यात आली़ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर या दोन्ही सुविधा आहेत़ प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सरकता जीना बसविला असून, प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्यभागी लिफ्ट बसविली आहे़ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी या सुविधा फायद्याच्या ठरतील, असे वाटत होते़ मात्र या सुविधा गैरसोयीच्या झाल्या आहेत़मनमाडकडून रेल्वेगाडी आल्यानंतर ती स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध उभी केली जाते़ त्यामुळे शेवटच्या डब्यामध्ये बसणाºया मोजक्याच प्रवाशांना ही सुविधा सोयीची ठरत आहे़ मात्र इतर प्रवाशांना बरेच अंतर पार करून लिफ्ट, सरकत्या जीन्याचा वापर करावा लागतो़ त्यामुळे हा सरकता जीना प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे