शहरं
Join us  
Trending Stories
1
शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय?
2
रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध
3
भाजपा खासदाराच्या सुनेच्या कारची धडक बसून तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृतदेह घरासमोर ठेवून केलं आंदोलन 
4
भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १० कायदे अंमलात, राज्यपाल रवि यांना दणका
5
"एका सीनमध्ये त्यांनी माझ्या गुप्तांगांवर...", अभिनेत्रीचा ७२ वर्षीय अभिनेत्यावर खळबळजनक आरोप
6
अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
7
सुदानमध्ये उपासमारीशी झुंजत असलेल्या लोकांवर RSFचा भीषण हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू 
8
"या माणसाला सगळा...", सुष्मिता सेनच्या भावावर भडकली पूर्व पत्नी, लेकीला घेऊन सोडली मुंबई
9
हृतिक अन् प्रियंका चोप्राचं रियुनियन! 'क्रिश ४'साठी 'देसी गर्ल'ने केली इतक्या कोटींची मागणी?
10
विशेष लेख: टॅरिफचा धोका अन् बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी 
11
आजचे राशीभविष्य - १३ एप्रिल २०२५, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस
12
Mumbai Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या... आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक
13
धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली
14
जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट
15
'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले
16
UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले
17
लेख: शिक्षण सक्तीचे हवे की ऐच्छिक? कशी दूर होईल विषमता?
18
टॅरिफमुळे जगाला फटका, भारताला फायदा; अमेरिका, चीन बाजारांतील निर्यात भारताकडे येणार
19
विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा
20
IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!

परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:18 IST

डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़

लोकमत न्यूज नेटवर्कराणीसावरगाव (परभणी) : डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़राणीसावरगाव येथे सुमारे ७०० वर्षापूर्वी बांधलेले देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे़ विश्वस्त म्हणून गळाकाटू कुटूंबातील वंशज काम पाहतात़ यावर्षी १० आॅक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे़ गावातील प्रत्येक घरात घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात़ माहूर व तुळजापूरच्या देवीचे ठाण म्हणून येथील रेणुका देवीची भक्तीभावे आराधना केली जाते़ माहूर, तुळजापूरला जाणारे भाविक आवर्जून राणीसावरगाव येथे येऊन दर्शन घेतात़ नवसाला पावणारी देवी अशी या देवीची अख्यायिका आहे़ नवरात्र उत्सव काळात लातूर, नांदेड, परभणी आणि शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून भाविक राणीसावरगाव येथे दाखल होतात़ भाविकांची संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे़ श्री चुडामुनी महाराजांची पालखी अहमदपूर येथून राणीसावरगाव येथे येते़ या पालखी सोहळ्यात ३ ते ४ हजार भाविकांचा सहभाग असतो़ राणीसावरगाव येथे यावर्षी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ दररोज रात्री आरती होते़ श्रींच्या नावाने प्रसाद वाटप केला जातो़ आष्टमीला होमहवन केले जाते़ दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनात पालखी मिरवणूक काढली जाते़ सर्व गावकरी पालखी सोबत माळावरील मूळ पीठ असलेल्या देवी मंदिरात जमतात़ या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होतो़पोलिसांचा चोख बंदोबस्तराणीसावरगाव येथे नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या दररोज वाढत आहे़ गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोºया होण्याची शक्यता असते. तेव्हा पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून, या ठिकाणीही पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीNavratriनवरात्री