शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे पोलिसांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:43 IST

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना परभणी येथील न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांनापरभणी येथील न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.याबाबत अ‍ॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांनी दिलेली माहिती अशी- परभणी शहरातील आसेफनगर भागातील पीडित महिलेस अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आरोपी चंद्रमोरे गंगाराम मोरे, कमळाबाई गंगाराम मोरे, रामा मोरे, राजू रामा मोरे यांनी आरोपी चंद्रमोरे मोरे याच्यासोबत लग्नाचे अमिष दाखविले.आमचे परभणीत नातेवाईक आहेत, तेथे जावून लग्न करु, असे सांगून पीडितेला १७ जुलै २०१८ रोजी बाहेरगावहून परभणी येथे बोलावून घेतले व आसेफनगर भागातील एका घरामध्ये आरोपी चंद्रमोरे मोरे याने साथीदारांना कोर्ट मॅरेजचे कागदपत्र तयार करण्यासाठी बाहेर जाण्यास सांगितले व पीडित महिलेवर बलात्कार केला. सदरील महिला ओरडत असताना ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या बरोबर लग्न करणार नाही, तुझी बदनामी करेल, तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेल, अशी धमकी देऊन बळजबरीने सिंदी पाजून यौन शोषण केले. ३ आॅगस्ट २०१८ रोजी पीडित महिला आरोपीच्या तावडीतून सुटून न्यायालयात आली व अ‍ॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीडितेस कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले; परंतु, कोतवाली पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने अ‍ॅड.स.मुज्जमील यांच्या मार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पंडित यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली.या प्रकरणी युक्तीवाद ऐकूण व कागदपत्राचे अवलोकन करुन न्या.वैशाली पंडित यांनी २ जानेवारी रोजी कोतवाली पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंद करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. पीडित महिलेच्या वतीने अ‍ॅड.सय्यद मुज्जमील हाश्मी यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.आसेफ पटेल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस