शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

परभणी : १२०० जागांसाठी अवघे १९२ अर्ज झाले प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी असलेल्या डी.एड. या पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मागील अनेक वर्षांपासून पाठ फिरवली असून यावर्षी देखील हाच अनुभव येत आहे. जिल्ह्यात डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु असून एकूण १२०० जागांसाठी केवळ १९२ अर्ज आॅनलाईन पद्धतीने प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील डी.एड.च्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी असलेल्या डी.एड. या पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मागील अनेक वर्षांपासून पाठ फिरवली असून यावर्षी देखील हाच अनुभव येत आहे. जिल्ह्यात डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु असून एकूण १२०० जागांसाठी केवळ १९२ अर्ज आॅनलाईन पद्धतीने प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील डी.एड.च्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही वर्षांपूर्वी डी.एड. पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा होता. सुरुवातीला दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर थेट डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात होता. त्यात बदल करुन आता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डी.एड. पदविकेला प्रवेश दिला जातो. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी डी.एड. प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र मागील काही वर्षांपासून डी.एड. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. हाच अनुभव यावर्षीच्याही प्रवेश प्रक्रियेत येत आहे. जिल्ह्यामध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्या १२०० जागा उपलब्ध असून २८ जूनपर्यंत डी.एड. प्रवेशासाठी केवळ १९२ अर्ज आॅनलाईन पद्धतीने दाखल झाले. त्यापैकी ६४ अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करण्यात आले असून ८६ अर्जांना मंजुरी दिली आहे. एका अर्जात त्रुटी असल्याची माहिती मिळाली. राज्यभरात डी.एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये संधी मिळविण्यासाठी टीईटी ही पात्रता परीक्षा द्यावी लागते. मात्र तरीही नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी उपलब्ध जागांच्या तुलनेत आॅनलाईन अर्जांची संख्या अत्यंत तोकडी असल्याने यावर्षीही परभणी जिल्ह्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.७ विद्यालयांत : प्रवेश प्रक्रिया बंद४परभणी जिल्ह्यात डी.एड. अभ्यासक्रमाचे एकूण २४ विद्यालये आहेत. त्यापैकी ७ विद्यालयांमध्ये मागील तीन वर्षांपासून एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नसल्याने शिक्षण विभागाने यावर्षी या विद्यालयांमधील प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे केवळ १७ विद्यालयांमध्येच प्राप्त अर्जामधून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.४ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील निर्मलाबाई मालूसरे अध्यापक विद्यालय, धर्मापुरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यापक विद्यालय, परभणी येथील रामकृष्ण परमहंस अध्यापक विद्यालय, सेलू तालुक्यातील वालूर येथील वाल्मिकेश्वर अध्यापक विद्यालय, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील कै. आबाजी भोसले अध्यापक विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.परभणीतील शासकीय विद्यालयही बंद४परभणी येथे जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेत डी.एड. अभ्यासक्रम चालविला जात होता. मात्र शासनाच्या या संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी असल्याने यावर्षीपासून शासकीय संस्थेतील प्रवेश प्रक्रियाही बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली.दोन वेळा दिली मुदतवाढ४डी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. ३१ मेपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने दोन वेळा प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली.४ या मुदतवाढीनुसार ३० जून ही आॅनलाईन प्रवेशाची अंतिम तारीख असून १ जुलै रोजी या प्रक्रियेत दाखल केलेल्या अर्जांची मंजुरी विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये आणखी किती अर्जांची भर पडते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीTeacherशिक्षक