शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ईव्हीएम मशीनची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:33 IST

जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने आॅनलाईन नोंद घेण्याचे काम सुरु झाले आहे. येथील कल्याण मंडप परिसरातील स्ट्राँगरुममध्ये पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने हे काम केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने आॅनलाईन नोंद घेण्याचे काम सुरु झाले आहे. येथील कल्याण मंडप परिसरातील स्ट्राँगरुममध्ये पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने हे काम केले जात आहे.परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांमार्फत ही कामे केली जात आहेत. महिनाभरापूर्वीच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती तपासण्यात आली. तसेच या केंद्रांवरील सुविधा व एकूण मतदान केंद्रांची माहिती भारत निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसांतच परभणी जिल्ह्याला २९८६ मतदान यंत्र प्राप्त झाले असून हे यंत्र सध्या कल्याण मंडपम् येथील स्ट्राँगरुममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत.दरम्यान, प्राप्त झालेल्या मतदान यंत्राची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने नोंदणी करण्याचे काम गुरुवारपासून सुरु झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना पत्र देऊन नोंदणी करताना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार असून ही नोंदणी राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोगाकडे दाखल केली जाणार आहे.त्यामुळे कोणत्या क्रमांकाचे मतदान यंत्र कोणत्या जिल्ह्यात आहे, याची नोंद निवडणूक आयोगाकडे राहणार आहे.जिल्ह्यात या कामाला सुरुवात झाली असून तीन दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या नोंदणीसाठी प्रशिक्षित कर्मचाºयांची नोंदणीही करण्यात आली आहे. एकंदर जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे.नोंद घेण्यासाठी: १२ अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती४प्राप्त झालेल्या २९८६ मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीद्वारे नोंदणी घेण्यासाठी १२ अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज केले जात आहे. तसेच निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार नंदकुमार भातांब्रेकर यांचीही या कामी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय मानवत येथील अव्वल कारकून रवि कवडे, सोनपेठ येथील अव्वल कारकून गंगाधर विरमले, सेलू तहसील कार्यालयातील लिपीक आबासाहेब लोखंडे, परभणी तहसील कार्यालयातील लिपीक वसीम आक्रम, पालम तहसील कार्यालयातील लिपीक कुलकर्णी, गंगाखेड तहसीलमधील लिपीक किरण साखरे यांच्यासह डाटाएंट्री आॅपरेटर बाळासाहेब साळवे, पठाण वसीम अहमद खान, सय्यद शकील सय्यद रज्जाक, दिवाकर जगताप आदींची याकामी नियुक्ती केली असल्याची माहिती मिळाली.प्रशासनाची तयारी४निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या तयारीचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु झाली असून राजकीय पक्षांनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात त्या दृष्टीने वातावरण निर्मिती होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीonlineऑनलाइनElectionनिवडणूक