शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कांदा उत्पादनाला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:48 IST

तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़पालम तालुक्यात गोदावरी नदीच्या पट्ट्यातील आरखेड, सोमेश्वर व उमरथडीच्या शिवारात दरवर्षी रबी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जाते़ आरखेड गाव तर मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी २०० एकरवर कांदा पीक घेण्यात आले होते़यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ होत होती़ परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडून गेली आहेत़ कांदा पिकासाठी शेतकºयांनी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केले़ परंतु, या पिकातून शेतकºयांना उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला़कांदा पिकाला भरपूर पाणी लागत असल्याने यावर्षी पाण्याचा ताण पडला आहे़ त्यामुळे पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे कांद्याची वाढ कमी होवून कांद्याचा आकार हा लहान राहिला आहे़ यामुळे कांद्याला बाजारपेठेत मागणी नाही़ त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत़सरसकट मदत देण्याची मागणीदरवर्षी पालम तालुक्यात इतर फळपिकांबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या आरखेड व परिसरातील कांदा उत्पादकांची मदार ही डिग्रस बंधाºयातील पाण्यावर होती़; परंतु, प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकºयाच्या सिंचन व ग्रामस्थांच्या पाण्याचा विचार न करता काही महिन्यांपूर्वी डिग्रस बंधाºयातील संपूर्ण पाणी नांदेडसाठी सोडून दिले़ त्यामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाºया या कांदा उत्पादक शेतकºयांना डिग्रसमधील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यायच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी शेतकºयांना आपल्या पिकांवर पाणी फेरावे लागले़ कृषी विभाग व राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदाFarmerशेतकरी