शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

परभणी : मानवतमध्ये भाजपचे सखाहरी पाटील यांचा एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:07 AM

येथील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील, काँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष रतन वडमारे अशी तिरंगी निवडणूक झाली होती़ या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी १०़३० वाजता जाहीर झाला़ त्यामध्ये भाजपाचे सखाहरी पाटील यांना १२ हजार २१० तर काँग्रेसच्या पूजा खरात यांना २ हजार ७७१ मते मिळाली़ अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांना २७३ आणि नोटाला १४३ मते मिळाली़ भाजपाच्या पाटील यांनी काँग्रेसच्या खरात यांचा तब्बल ९ हजार ४३९ मतांनी पराभव केला़ निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा निकाल जाहीर केला़ त्यानंतर भाजपाच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी आ़ मोहन फड, डॉ़ अंकुश लाड, विजयी उमेदवार प्रा़ सखाहरी पाटील, गंगाधर कदम, नगरसेवक बाबूराव हलनोर, गिरीष कत्रूवार, गणेश कुमावत, बालाजी कुºहाडे, प्रभाकर वाघीकर, दत्ता चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी दहे, मोहन लाड, गणेश कुमावत, राजू खरात, मुंजाभाऊ तरटे, किरण बारहाते आदींची उपस्थिती होती़परभणी मनपाच्या पोटनिवडणुकीत गवळणबाई रोडे, अब्दुल फातेमा विजयीपरभणी : येथील महापालिकेच्या सदस्य पदाच्या दोन जागांसाठी सोमवारी मतमोजणी झाली़ त्यात प्रभाग ३ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे तर प्रभाग ११ अ मधून एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अ़ जावेद विजयी झाल्या आहेत़महापालिकेच्या एका सदस्याचे निधन झाल्याने तर दुसऱ्याच्या सदस्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने दोन रिक्त पदांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती़ प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ त्यात एआयएमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांना ३ हजार ७३४ मते पडले असून, त्यांचे प्रतीस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे अ‍ॅड़ सय्यद जावेद कादर सय्यद अब्दुल कादर यांना १ हजार ५९७ मते मिळाली़ २ हजार १३७ मतांनी अब्दुल फातेमा अ़ जावेद विजयी झाल्या आहेत़ प्रभाग क्रमांक ३ ड मध्ये एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ या प्रभागातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार गवळण रामचंद्र रोडे यांना ३ हजार ६८ मते मिळाली असून, अपक्ष उमेदवार अलीमोद्दीन इमामोद्दीन यांना १ हजार ३४९ मते मिळाली़ तर अन्य एक अपक्ष उमेदवार फेरोज खान कलंदर खान यांना १ हजार २६५ मते मिळाली आहेत़ या प्रभागात राकाँच्या गवळण रोडे या १ हजार ७१९ मतांनी विजयी झाल्या आहेत़शहरातील कल्याण मंडपम् परिसरात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली़ दुपारी साधारणत: १ वाजेच्या सुमारास सर्व निकाल हाती आले़ निकालानंतर विजयी उमेदवारांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत स्वागत केले़एमआयएमची पहिल्यांदाच मनपात एंट्री४एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच यावेळी दोन्ही जागांवर निवडणूक लढविण्यात आली़ त्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये एमआयएमला यश मिळाले़ या माध्यमातून पहिल्यांदाच महानगरपालिकेत एमआयएमने एंट्री केली आहे़ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहता व मनपा पोट निवडणुकीतील निकाल लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम- वंचित बहुजन आघाडीकडे इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़काँग्रेससाठी सोमवार ठरला निराशाजनक दिवस४सोमवारी मतमोजणी झाली़ या मतमोजणी अंती हा दिवस काँग्रेससाठी निराशाजनकच ठरल्याचे दिसून आले़ परभणी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या ताब्यातील जागा एमआयएमकडे गेली तर तिकडे मानवत नगरपालिकेत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला़ सोनपेठमध्येही काँग्रेसला थारा मिळाला नाही़ त्यामुळे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासाठी हा चिंतनाचा दिवस ठरला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक