लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा शिवारात टोमॅटो घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.औरंगाबाद येथील शेतकऱ्यांचे टोमॅटो परभणी येथील बाजारपेठेत विक्री करण्यासाठी कंटेनर वाहन क्रमांक एम.एच. २०- डीई ९०७९ यामधून नेले जात होते. हे वाहन कोल्हा शिवारात राष्ट्रीय महामार्गावर मानवतकडे जाणाºया नवीन वळण रस्त्यावर आले. तेव्हा वाहन चालक गोंधळून गेल्याने वाहनावरील त्याचा ताबा सुटला. त्यामळे कंटेनर उलटला. या अपघाने रस्त्यावर सर्वत्र टोमॅटो पसरले होते. कंटेनर वाहनाचा चालक रामेश्वर काळवणे (४०, रा.औरंगाबाद) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर नवीन वळण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने धोकादायक वळण तयार केल्याने दररोज एक तरी छोटा-मोठा अपघात होत आहे.
परभणी : कंटेनर उलटून एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:56 IST