शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी : सव्वा लाख नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:32 IST

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात असून, या योजनेत १ लाख ३५ हजार ६८४ लाभार्थ्यांना आरोग्याचे विमा संरक्षण दिले जाणार आहे़ योजनेंतर्गत परभणी शहरातील सुमारे २३ हजार ६१६ कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वितरित करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात असून, या योजनेत १ लाख ३५ हजार ६८४ लाभार्थ्यांना आरोग्याचे विमा संरक्षण दिले जाणार आहे़ योजनेंतर्गत परभणी शहरातील सुमारे २३ हजार ६१६ कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वितरित करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे़प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना आरोग्यासाठी ५ लाख रुपयांचे प्रतिवर्षाचे संरक्षण देऊ करण्यात आले आहे़ सुमारे १३०० आजारांवरील उपचार या योजनेच्या माध्यमातून मोफत केले जाणार आहेत़ शहरवासियांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ २०११ मध्ये झालेल्या जनगणनेवर आधारित या योजनेत २३ हजार ६१६ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे़ या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या नावाने प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतची उपचाराची सुविधा देण्यात आली आहे़ ही सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक सदस्याला कार्ड वितरित केले जाणार आहे़ हे कार्ड मिळवून घेण्यासाठी पंतप्रधानांकडून आलेले पत्र दाखल करणे आवश्यक आहे़ महापालिकेकडे असे पत्र उपलब्ध झाले असून, शहरात वार्डनिहाय या पत्रांचे वाटप केले जात आहे़लाभार्थी कुटूंबियांना पंतप्रधानांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर या कुटुंबियांनी सीएससी केंद्रांवर जाऊन घरातील प्रत्येक सदस्याच्या आधार क्रमांकासह नोंदणी करणे अपेक्षित आहे़ तसेच या लाभार्थ्यांचे थम्ब इम्प्रेशनही घेतले जाणार आहे़ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, पंतप्रधानांचे पत्र आदी कागदपत्र दाखल केल्यानंतर ही माहिती योजनेच्या वरिष्ठ कार्यालयाकडै पाठविली जाणार असून, त्यानंतर प्रत्येक सदस्याच्या नावे जनआरोग्य योजनेचे कार्ड उपलब्ध होणार आहे़ संपूर्ण कुटूंबाला आरोग्याच्या कक्षेत आणणारी ही योजना असल्याने महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी कुटूंबियांना पंतप्रधानांचे पत्र वाटप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल़ आठवडाभरात सदस्यांचे कार्ड प्राप्त होतील, असा विश्वास मनपाने व्यक्त केला आहे़१३०० आजारांवर होणार उपचार४पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत वेगवेगळ्या १३०० आजारांवरील उपचार मोफत केले जाणार आहेत़ या योजनेत हृदयविकार, कर्करोग, दमा, हाडाचे आजार, पोटाचे विकार अशा विविध आजारांचा समावेश आहे़४या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जातो़ पैशांअभावी अनेक जण उपचार करू शकत नाहीत़ परिणामी, त्यांना यातना सहन कराव्या लागता़ गोरगरीब नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे़केंद्र, राज्याचा वाटा४या योजनेत समावेश असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचे उपचार त्यांच्या आजाराच्या गरजेनुसार दिले जाणार आहेत़४या ५ लाखांमध्ये १ लाख ५० हजार रुपये राज्य शासनाचे आणि ३ लाख ५० हजार रुपये केंद्र शासनाचा वाटा आहे़ केंद्र आणि राज्य मिळून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे़४सध्या या योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे़ कालांतराने पुणे, मुंबईसारख्या शहरांमधील नामवंत खाजगी रुग्णालयांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती मिळाली़महानगरपालिकेतील आरोग्य विभागासह अंगणवाडी सेविका, एनएम, मदतनीस या माध्यमातून पंतप्रधानांकडून आलेली पत्रे लाभार्थी कुटुंबियांना वाटप केले जात आहेत़ या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच शहरातील सीएससी केंद्र चालकांची लवकरच बैठक घेऊन लाभार्थ्यांकडून घ्यावयाची कागदपत्रे आणि आॅनलाईन डाटा फिड करण्यासंदर्भात सूचना देणार आहेत़ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.-सचिन देशमुख, आरोग्य सभापती, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीMayorमहापौरMuncipal Corporationनगर पालिका