शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

परभणीत जुनी पाणी पुरवठा योजना ठरली पर्यायी, मनपाची झाली ४० लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 20:20 IST

परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय थांबणार

परभणी :  शहराला पाणीपुरवठा करणारी राहटी येथील जुनी योजना पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय घेतल्याने महानगरपालिका प्रशासनाची महिन्याकाठी तब्बल ४० लाख रुपयांची बचत होणार आहे. येत्या आठवडाभरात शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा येलदरी येथील योजनेवरुन सुरु केला जाणार आहे. 

परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेचे काम पूर्ण झाले असून शहरात सध्या नव्या योजनेवर नळ जोडणी दिली जात आहे. ही योजना कार्यान्वित करीत असतानाच मनपा प्रशासनाने जुनी योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरातील वसमत रोड भागातील ममता कॉलनीतील पाण्याची टाकी, एमआयडीसी भागातील पाण्याची टाकी आणि राजगोपालाचारी उद्यानात नव्याने उभारण्यात येत असलेली पाण्याची टाकी या तिन्ही पाण्याच्या टाक्या जुन्या योजनेवरच ठेवल्या होत्या. त्यामुळे वसमत रोड भागातील बहुतांश वसाहतींना राहटी येथील जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात होता.

यासाठी ही संपूर्ण यंत्रणा सुरु ठेवण्यासाठी महानगरपालिकेला प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असे. राहटी येथील पंप हाऊस आणि वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राचे वीज बिल साधारणत: २० ते २२ लाख रुपये येत होते. तसेच राहटी येथील पंप २४ तास सुरु ठेवावे लागत असल्याने या पंपांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला २० लाख रुपयांचा खर्च होतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व रसायनावर साधारणत: वर्षाला २५ लाख रुपयांचा खर्च करावा लागत असे. याशिवाय पंपहाऊस येथील ८ आॅपरेटर आणि जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी असे १६ कर्मचारी या योजनेवर काम करीत होते. महानगरपालिका प्रशासनाने ही सर्व यंत्रणा पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत तिन्ही जलकुंभ येलदरी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेला जोडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाले. त्यामुळे येत्या आठवडाभरात संपूर्ण शहराला येलदरी येथील योजनेवरुन पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे राहटी येथील योजनेवरील वीज बिल १० ते १५ लाखांनी कमी होणार आहे. शिवाय ब्लिचिंग पावडरवर होणारा महिन्याकाठीचा १० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. तसेच राहटी बंधाºयात येलदरी येथून नदीपात्रातून पाणी विकत घेतले जात होते. हा सर्व सुमारे महिन्याकाठी ४० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. त्याच प्रमाणे राहटी बंधाऱ्यावरील १६ कर्मचाºयांपैकी १० कर्मचारी नवीन योजनेच्या कामासाठी उपयोगात येणार आहेत.

शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठाराहटी येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षापूर्वीची जुनी आहे. या योजनेवरील जलवाहिनी जागोजागी खराब झाली असून नळांना पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तसेच शहरवासियांना ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय झाल्याने आता येलदरी येथील पाणी थेट जलवाहिनीने शहरात पोहोचले असल्याने पाणी वितरण करणे सोयीचे होणार आहे. परिणामी शहरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

वीज पुरवठ्याचा अडथळाही दूरराहटी येथील योजना चालविण्यासाठी महानगरपालिकेने या भागात महावितरण कंपनीकडून एक्सप्रेस फिडर बसविलेले आहे. मात्र मागच्या काही वर्षांपासून या एक्सप्रेस फिडरवरील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परिणामी, मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. आता ही योजना पर्यायी स्वरुपात वापरली जाणार असल्याने विजेचा अडथळाही दूर होणार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी