शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :जिओ टॅगिंग करूनच होणार नरेगाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:10 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता कोणतेही काम जिओ टॅगिंग शिवाय करता येणार नाही. त्यामुळे बनावट व कागदावरच होणाºया कामांना चाप बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता कोणतेही काम जिओ टॅगिंग शिवाय करता येणार नाही. त्यामुळे बनावट व कागदावरच होणाºया कामांना चाप बसणार आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा आणि विकासकामेही मार्गी लागावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत केल्या जाणाºया कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या. अनेक कामे आणि कामांवरील मजुरांची उपस्थिती, यातही गैरप्रकार झाल्याची ओरड होती. या गैरव्यहाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने जिओ-टॅगिंग प्रणाली सुरू केली. या अंतर्गत भूवन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. मागील वर्षी जिओ- टॅगिंगचा पहिला फेज जिल्ह्यात पूर्ण झाला. मग्रारोहयोमध्ये २००८ पासून झालेल्या सर्व कामांचे जिओ- टॅगिंग करण्यात आले आहे.नोव्हेंबर २०१७ पासून या योजनेच्या दुसºया टप्प्याला सुरुवात झाली आहे. आता या टप्प्पात महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रत्येक कामांचे जिओ- टॅगिंग करणे बंधनकारक आहे. नरेगा अंतर्गत सिंचन विहीर, शेततळे, शौचालयाचे बांधकाम, शेत रस्ता, वृक्षारोपण आदी कामे केली जातात. जिओ-टॅगिंगचा दुसरा फेज सुरू झाल्याने आता या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन टाकलेल्या मार्क आऊटच्या लोकेशनसह जिओ- टॅगिंग करावयाचे आहे. हे जिओ टॅगिंग झाल्यानंतरच त्या कामाचे मस्टर तयार होणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आणखी एकदा कामाचे जिओ टॅगिंग आॅनलाईन करावयाचे असून, त्यानंतर १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याचे टॅगिंग करावयाचे आहे. त्यानंतरच संबंधित कामाचे देयक अदा होणार आहे.जिओ-टॅगिंगच्या दुसºया टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात झाल्याने आता प्रत्येक कामाचे आॅनलाईन स्थळ आणि त्या कामाची स्थिती आॅनलाईन बघता येणार आहे. तसेच काम पूर्ण झाले की नाही, याची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय रोहयो कामांतील गैरव्यवहारही कमी होणार आहे. रोहयो अंतर्गत होणारे प्रत्येक काम पूर्ण करावेच लागणार असून, यामाध्यमातून कामाला गतीही द्यावी लागणार आहे. त्यामुळे मनरेगा अंतर्गत होणाºया गैरव्यवहारांना जिओ-टॅगिंगच्या साह्याने आळा बसणार असून, कामेही पूर्ण होणार आहेत.३०५ कामांचे फोटो आॅनलाईनयावर्षी मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात ६०३ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजुरीनंतर कर्मचाºयांनी ३०५ कामांच्या मार्कआॅऊटचे फोटो भुवन पोर्टलवर आॅनलाईन अपलोड केले आहेत. आणखी २९८ कामांचे फोटो अपलोड करण्याचे काम शिल्लक आहे. ३०५ कामांचे फोटो पोर्टलवर अपलोड झाल्याने या कामांचा मस्टर नोंदणीचा मार्ग आता मोकळा झाला असून, लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. उर्वरित कामांचे फोटो अपलोड करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती नरेगा विभागातून मिळाली.यांच्यावर आहे जबाबदारीमहाराष्टÑ शासनाने भुवन हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. अँड्रॉईड बेसड् हे अ‍ॅप्लीकेशन जिल्ह्यातील संबंधित कर्मचाºयांना देण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनवर फोटो क्लिक केल्यानंतर त्याचे लोकेशनही येणार आहे. मनरेगा अंतर्गत कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि तांत्रिक सहायकांनी त्या कामाचे फोटो भुवन पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत. हे फोटो अपलोड केल्यानंतरच मजुरांचे मस्टर तयार करण्यास मंजुरी मिळणार असून, पुढील कामाला प्रारंभ होणार आहे. काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो अपलोड झाला नसेल तर त्या कामाला मंजुरीही मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक काम सुरू होण्यापूर्वी, त्यानंतर ३० टक्के काम झाल्यानंतर आणि काम पूर्ण झाल्यानंतर असे तीन वेळा आॅनलाईन फोटो अपलोड करावे लागणार आहेत.