शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

परभणी : आता टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:42 IST

टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधीलशिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यानुसार शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार या परिषदेने शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी काढले होते. त्या अनुषंगाने परभणी येथील शिक्षण विभागाच्या वतीने ३० डिसेंबर रोजी खाजगी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष व सचिवांच्या नावे आदेश काढण्यात आला होता. त्यामध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नवीन आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी ३ जानेवारी रोजी सर्व शासकीय माध्यमिक शाळांचे अध्यक्ष व सचिवांच्या नावे आदेश काढला आहे. त्यात शिक्षण संचालकांनी ३१ डिसेंबर रोजी काढलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आला असून सदरील परिपत्रकाच्या निर्देशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेऊन शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत शाहनिशा करुन सेवा समाप्तीचे बोलके आदेश पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशानुसार संबंधित संस्थेने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत कारवाई करावी. परस्पर कोणतेही आदेश काढू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. दिलेल्या आदेशानुसारच कारवाई करावी, असेही ३ जानेवारीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.सुनावणीनंतर होणार अंतिम निर्णय ?४टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी या शिक्षकांची शिक्षण उपसंचालक सुनावणी घेणार आहेत.४या सुनावणीनंतर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना अप्रत्यक्षरित्या आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत संभ्रावस्था कायम४शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या आदेशात एकीकडे सेवा समाप्तीचे बोलके आदेश पारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी पुन्हा एकदा या शिक्षकांची सुनावणी घेणार असल्याचे सांगून या संदर्भात संभ्रम निर्माण केला आहे.४ एकदा सेवा समाप्तीचा आदेश काढल्यानंतर पुन्हा कशी काय सुनावणी होऊ शकते? असा सवाल उपस्थित होत आहे. सेवा समाप्तीचा आदेश काढण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण का केली नाही? सातत्याने निर्णयांमध्ये बदल करुन संभ्रमावस्था का निर्माण केली जात आहे, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाTeacherशिक्षक