शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:16 IST

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.दोन वर्षापासून पाऊस सरासरी देखील गाठत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर तर होतच आहे. या शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीपातळीतही सातत्याने घट होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला. विशेष म्हणजे परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी परभणी जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती नाजूक झाली आहे. जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या दोन प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा भार आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पात जेमतेम ९ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये ४७ टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. सहा महिन्यांच्या काळात या दोन्ही प्रकल्पांमधील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यात आला. मागील वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. या आरक्षणानुसार जून महिन्यापर्यंत परभणी जिल्ह्यातील शहरी भागाला पाणी उपलब्ध झाले आहे.सद्यस्थितीला पावसाळा सुरु झाला असला तरी प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठा शिल्लक नाही. ९३४ दलघमी क्षमतेच्या येलदरी प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या प्रकल्पात मृतसाठ्यात पाणीसाठा आहे. तर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ३४४.८०० दलघमी क्षमतेचा असून या प्रकल्पामध्येही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय करपरा मध्यम प्रकल्प, मासोळी मध्यम प्रकल्प, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी या गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा शिल्लक नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात हे सर्व प्रकल्प पाण्याने भरले तरच पुढील वर्षीच्या उन्हाळ्याची चिंता मिटणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून मान्सूनचा एक हलका पाऊसही जिल्ह्याता झाला आहे. मात्र ६ महिन्यांपासून जिल्ह्यातील जमीन तापलेली असून भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहिले नाही. सध्या शेतकऱ्यांना पेरण्यासाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे.निम्न दुधनाच्या पाण्याने जिल्ह्याला तारले४यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने पाणीटंचाई अधिकच गंभीर झाली होती. निम्न दुधना प्रकल्पातच बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाचे पाणी परभणी, पूर्णा, सेलू या तीन शहरांसह तीनही तालुक्यांमधील अनेक गावांसाठी वापरण्यात आले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाचा या तालुक्यांना हातभार लागला.४आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी अनेक गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला. आता या प्रकल्पातही पाणीसाठा शिल्लक नसून पावसाळ्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.मृतसाठ्यात उपलब्ध पाणी४जिल्ह्यातील एकाही प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. सर्वच्या सर्व प्रकल्प मृतसाठ्यात आहेत.४येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यात ९१.६२३ दलघमी, निम्न दुधना प्रकल्पात ५५.१९ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १.५७ दलघमी तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये १.७५ दलघमी पाणी मृतसाठ्यात शिल्लक आहे. इतर चारही बंधारे, झरीचा तलाव आणि २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी