शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

परभणी : विविध गुन्ह्यांतील नऊ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:17 IST

पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़पालम शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांत वाढ झाली होती़ दुचाकी चोरीसह तांब्याच्या प्लेट चोरीच्या घटनाही घडल्या आहेत़ याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता़ पोलिसांनी सहा प्रकरणांचा तपास लावला असून, त्यात ९ आरोपींना अटक केली आहे़ दुचाकी चोरीच्या प्रकरणामध्ये आरोपी विनायक शिवाजी हाके, बालाजी पांडूरंग सूरनर, सद्दाम शेख बाबू, माधव निवृत्ती हत्तीअंबिरे या चौघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सहा दुचाकी वाहने जप्त केली आहेत़तांब्याच्या प्लेट चोरीच्या घटनेत शेख गौस, सालेमिया मोहम्मद चाऊस, शाहरुख समीर पठाण, रईस पठाण समद पठाण, अफरोज पठाण कलंदर पठाण या पाच आरोपींना अटक करण्यात आली़यातील शेख गौस हा व्यापारी असून, इतर चौघांनी चोरीचा माल त्यास विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले़पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात ९ आरोपींना अटक केली आहे़ ६ मोटारसायकल, तांब्याच्या ४६ पट्ट्या, ३ रॉड असा १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पालम पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण, रामकिशन काळे, किशोर भुमकर, गणेश कौटकर, विशाल वाघमारे, राजेश आगाशे, राठोड आदींनी केली़पूर्णा दंगलीतील आरोपी ताब्यातपरभणी- आॅगस्ट महिन्यात पूर्णा येथे झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे़ पूर्णा शहरात २५ आॅगस्ट रोजी दोन गटांतील वादातून दगडफेकीची घटना घडली होती़ या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ नरहरी सोलव (२४, रा़ बरबडी) याच्यासह इतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता़ घटनेनंतर सोमनाथ सोलव हा फरार होता़ स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गंगाखेड नाका येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले़ ही कामगिरी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव केंद्रे, लक्ष्मीकांत धृतराज, भगवान भुसारे, खुपसे, दिलावर पठाण, जमीरोद्दीन फारुखी, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, परमेश्वर शिंदे यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे