शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

परभणी : मनपातील १३ नगरसेवकांच्या पवित्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:58 IST

येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़परभणी महानगरपालिकेतील एका स्वीकृत सदस्य पदावरून गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्याचे दिसून येत आहे़ मंगळवारी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आयोजित कार्यशाळेस शहरातील सर्व नगरसेवकांना बोलावूनही ‘त्या’ १३ नगरसेवकांनी पक्ष नेत्यांचा आदेश डावलून दांडी मारली़ विशेष म्हणजे या दिवशी एकीकडे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यशाळेत असताना दुसरीकडे याचवेळी या १३ नगरसेवकांच्या गटाची महानगरपालिकेत बैठक झाली़ या बैठकीत अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, परिहार यांना जोपर्यंत न्याय दिला जाणार नाही, तोपर्यंत पक्षासोबत न राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ या १३ नगरसेवकांनी अगोदरच मनपातील गटनेता बदलला आहे़ शिवाय मनपातील १८ पैकी तब्बल १३ नगरसेवकांचा गट झाल्याने त्यांना पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटकाही बसणार नाही़ त्यामुळे पक्षाने कोणतीही कारवाई केली तरी परिहार यांच्या पाठीशी उभे राहूत, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोची झाली आहे़ राष्ट्रवादीतील ही बंडाळी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़ या १३ नगरसेवकांची समजूत न काढल्यास राष्ट्रवादीला शहरात फटका बसण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या नगरसेवकांची समजूत काढावी तरी कशी असा पेच पक्षातील अन्य नेत्यांसमोर उभा राहिला आहे़स्वराजसिंह परिहार यांना मुंबईला बोलावलेमाजी शहराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च रोजी मुंबई येथे चर्चेसाठी बोलावले आहे़ तशी माहिती अ‍ॅड़ परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत परिहार यांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश येते की नाही, याविषयी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे़ विशेष म्हणजे मनपातील १३ नगरसेवकांनी ११ मार्चपर्यंत परिहार यांना न्याय न दिल्यास लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली जाईल, असा इशारा मंगळवारच्या बैठकीत दिला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliticsराजकारणParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका