शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

परभणी:११ हजार मतदारांची नावे यादीत दोनदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:38 IST

मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील मतदार यादीतील ४५ हजार ९३ मतदारांची नावे दुबार आल्याची तक्रार एका राजकीय पक्षाकडून करण्यात आली होती. या तक्रारीतील २ हजार २५५ मतदारांची पडताळणी करणे बाकी असून ४२ हजार ८३८ नावांची आतापर्यंत पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान ओळखपत्रावरील छायाचित्र एकसारखे आढळून आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांतर कोणतेही नाव यादीतून वगळता येत नाही. यामुळे या दुबार नावांची बीएलओस्तरावर घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे व त्याच व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात येणार आहे. पुढील कारवाई निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार केली जाणार आहे. दरम्यान, तक्रार केलेल्या यादीमधील ३१ हजार ९८९ मतदारांचे चेहरे जुळत नाहीत. त्यांचेही फिल्ड व्हेरिफिकेशन होणार आहे. तत्पूर्वीच दुबार नावे आलेल्या ७६३ मतदारांची नावे पूर्वीच यादीतून डिलीट केली आहेत. तक्रार करण्यात आलेल्या यादीतील मतदारांची सखोल तपासणी करण्यात येणार असून तक्रारकर्त्या पक्षाला येत्या ३ ते ४ दिवसांत याबाबतची माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्यात म्हणजेच १८ एप्रिल रोजी होणार असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक विभाग तातडीने कारवाई करणार असून यासाठी सी व्हीजिल नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारी करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्या खर्च नोंदणीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाची नोंद नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यापासून द्यावी लागणार असून प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बँकेतून १ लाख रुपयाच्यावर रक्कम काढली जात असेल तर त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार त्यांना वाहने दिली जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती.२२ भरारी पथकांची स्थापना४आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात २२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून १५ व्हिडिओ सहनिरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. १८ स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ आचारसंहिता पथके स्थापन्यात आली आहेत. खर्चाची पडताळणी करण्यासाठी ४ पथकांची स्थापना करण्यात आली असून यासाठी ४ खर्च सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.२०१४ मध्ये आचारसंहिता भंगाचे ४८ गुन्हे४२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून २६ प्रकरणांमध्ये संंबंधित आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. १२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ३ प्रकरणात ए. बी. फायनल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.५४ संवेदनशील मतदान केंदे्र४परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६४ मतदारकेंद्र असून त्यातील ५४ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने हद्दपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी