शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

परभणी मनपा : आठ सभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:59 IST

हापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे.महापालिकेतील ७ विषय समित्यांसह ३ प्रभाग समिती सभापतींच्या निवडी वर्षभरापासून रखडल्या होत्या. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ८ दिवसांपूर्वी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जून रोजी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात शहर सुधार समिती सभापतीसाठी राष्ट्रवादीच्या नाजेमा बेगम शेख रहीम, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी काँग्रेसच्या वैशाली विनोद कदम, स्थापत्य समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या शेख समीना अहमद, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे प्रशास ठाकूर, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समितीसाठी काँग्रेसचे अ.कलीम अ.समद आणि गलिच्छ वस्ती घर बांधणी व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे नागेश सोनपसारे यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे या निवडी बिनविरोध होणार आहेत. तीन प्रभाग समितीच्या सभापतींपैकी प्रभाग समिती अ साठी राष्ट्रवादीच्या अमरिका बेगम अ.समद आणि प्रभाग समिती ब साठी काँग्रेसच्या खमीसा जान महमद जानू यांचे एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध होणार आहेत.दोन जागांसाठी लढतसभापतीपदांच्या दोन जागांसाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. विधी व महसूलवाढ समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अमोल पाथरीकर व अ‍ॅड. विष्णू नवले हे दोन अर्ज आले आहेत. तर प्रभाग समिती क च्या सभापतीपदासाठी भाजपाच्या उषा झांबड आणि काँग्रेसच्या महेमुद खान मजीद खान यांचे अर्ज आल्याने या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक