शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महानगरपालिका: संगणकीकरणासाठी लवकरच निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:08 IST

महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्व व्यवहार आॅनलाईन होत असल्याने महानगरपालिकेनेही यासाठी पाऊले उचलली आहेत. मागील दोन वर्षांपासून संगणकीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत; परंतु, त्यास अद्याप यश आले नाही. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संगणकीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार महापालिकेचे कामकाज संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मनपा अंतर्गत वसूल केले जाणारे कर, अंतर्गत कामकाज यासह इतर सेवाही आॅनलाईन करण्याचा महापालिकेचा विचार आहे.मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकीकरण करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून एजन्सीमार्फत महापालिकेतील कामकाजाचे संगणकीकरण केले जाणार आहे. मनपा वसूल करीत असलेला कर, महापालिकेतील अकाऊंटींग, सॉलिड अ‍ॅण्ड वेस्ट मॅनेजमेंट आदी प्रक्रिया आॅनलाईन करण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांकडून निविदा मागविण्याचे निश्चित केले आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही बाबी या निविदा प्रक्रियेत समाविष्ट राहतील. निविदा मंजूर झालेल्या एजन्सीने संगणकांसह त्यांचे सॉफ्टवेअर उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. एजन्सीचा कर्मचारी मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करेल. त्यानंतर महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन केले जाणार आहेत. दरम्यान सध्या निविदा प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने प्रशासनात कामकाज सुरु आहे. येत्या आठवडाभरात मनपा प्रशासन निविदा प्रक्रियेद्वारे संगणकीकरणाच्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. महापालिकेतील सर्व व्यवहार संगणकीकृत झाल्यानंतर शहरवासियांना जलद सेवा मिळतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.शासनाचे पोर्टल सुरु४महानगरपालिकेच्या संदर्भात असलेल्या काही शासकीय योजनांचे पोर्टल मनपात सुरु आहे. त्याअंतर्गत आरटीआय अ‍ॅक्टनुसारच्या आॅनलाईन सेवा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचे पोर्टलही महापालिकेत सध्या सुरु असून १ आॅगस्टपासून बांधकाम परवाना आॅनलाईन सुरु करण्यातत आला आहे. याशिवाय राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल आणि केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारेही नागरिकांना आॅनलाईन सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाonlineऑनलाइन